...तर 'मी पुन्हा येईन'; फडणवीसांकडून घोषणेचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 10:35 PM2019-12-13T22:35:37+5:302019-12-13T22:38:41+5:30

पुन्हा निवडणुका आल्या तरीही सामोरं जाण्याची तयारी; फडणवीसांचं सूचक विधान

i will come back if our leadership decides says bjp leader devendra fadnavis | ...तर 'मी पुन्हा येईन'; फडणवीसांकडून घोषणेचा पुनरुच्चार

...तर 'मी पुन्हा येईन'; फडणवीसांकडून घोषणेचा पुनरुच्चार

Next

मुंबई: जनतेनं आम्हाला सरकार चालवण्यासाठी पहिली पसंती दिली होती. मात्र इतर पक्षांनी बहुमताची जुळवाजुळव करून सरकार स्थापन केलं. आता आमच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. माझा डीएनएच विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडू, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या भूमिकेसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले. पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर मी पुन्हा येईन, असंदेखील ते पुढे म्हणाले. 

आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम करू. पुन्हा निवडणुका आल्या तरीही त्यांना सामोरं जाण्याची आमची तयारी आहे, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं. 'मी पुन्हा येईन असं जेव्ही मी म्हटलं होतं, तेव्हा तशी घोषणा माझ्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे आता  पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर 'मी पुन्हा येईन,' असं फडणवीस म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र विकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेवर घणाघाती टीका केली. आम्ही शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी विधानसभेसाठीदेखील युती करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडी उलगडून सांगितल्या. लोकसभेत सोबत लढलो आणि विधानसभेसाठी वेगळे झालो, हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकही शिवसेनेत सोबत लढा असा संदेश आम्हाला दिल्लीतून आला होता. त्यानुसार आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि जनतेनंदेखील आम्हाला कौल दिला. मात्र शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला, असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं.
 

Web Title: i will come back if our leadership decides says bjp leader devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.