'मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, पवारांनाही भेटेन; पण आता तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:18 PM2019-12-18T12:18:27+5:302019-12-18T12:18:40+5:30

मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका.

'I will meet the Chief Minister, I will also meet Pawar; But I don't plan to leave the BJP now! ' | 'मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, पवारांनाही भेटेन; पण आता तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही!'

'मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, पवारांनाही भेटेन; पण आता तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही!'

Next

नागपूरः मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपा सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नागुपरात कोणाचीही भेट घेतली नाही. या साऱ्या अफवा आहेत. विधानभवनात कामानिमित्त आलो आहे. मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही. माझं मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही. मी निर्णय घेतला असता तर वरिष्ठांवर मन वळवण्याचा प्रसंग आला असता. मी वरिष्ठांसोबत कायम संपर्कात असतो, असंही खडसेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहेत. भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे नागपुरात दाखल झालेले असून, ते लवकरच शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील नागपुरात आहेत. 

एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या 5 वर्षांत खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं. 

परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. जे 40 वर्ष पक्षासाठी झटले त्यांना अशी वागणूक का? आम्ही बाहेर पडत नाही तर आम्हाला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात असा आरोप एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. एकनाथ खडसेंनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, त्यावर पक्षनेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार की पक्षातच राहणार? हे येत्या काळात समजणार आहे. 

Web Title: 'I will meet the Chief Minister, I will also meet Pawar; But I don't plan to leave the BJP now! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.