…म्हणून मी मनसे कधीही सोडणार नाही; मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 04:18 PM2022-04-17T16:18:09+5:302022-04-17T16:18:46+5:30

राजसाहेब जे सांगतायेत ते कोर्टाचा आदेश पाळायला सांगत आहेत. त्यांचा अजाणला विरोध नाही असं मुस्लीम पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.

I will never leave MNS; Muslim office bearers support MNS Raj Thackeray | …म्हणून मी मनसे कधीही सोडणार नाही; मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंना पाठिंबा

…म्हणून मी मनसे कधीही सोडणार नाही; मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राज ठाकरेंना पाठिंबा

Next

अंबरनाथ  - मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत खाली उतरवा अन्यथा लाऊडस्पीकर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. भोंगे हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. आवाजाचा त्रास केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही होत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे भोंगे हटलेच पाहिजेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर पक्षातील अनेक मुस्लीम कार्यकर्ते नाराज झाले. मात्र राज ठाकरेंना पाठिंबा देणारे मुस्लीम पदाधिकारीही मनसेत आहेत.

अंबरनाथ येथील मनसेचे मुस्लीम पदाधिकारी एहसामोद्दीन खान यांनी हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात जात दर्शन घेतले. त्याचसोबत राज ठाकरेंच्या भोंगे हटवण्याच्या भूमिकेला त्यांनी समर्थन दिले आहे. एहसामोद्दीन खान म्हणाले की, अंबरनाथमध्ये कधीही जातीयवाद झाला नाही. शिवनगर परिसरात हनुमान मंदिरात मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मशिदीवरील भोंगे हटवावे असं म्हटलं होतं. त्यावेळी शाबीरभाई शेख यांनी शिवसेना सोडली नाही. शाबीरभाई हे अंबरनाथमधून ३ वेळा आमदार झाले. मंत्रिपद मिळाले. मीदेखील मनसे सोडणार नाही. राजसाहेब जे सांगतायेत ते कोर्टाचा आदेश पाळायला सांगत आहेत. त्यांचा अजाणला विरोध नाही असं त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे जे काही बोलले ते कायद्याने पाळण्याचं सांगितले त्यात चुकीचे काही नाही. सरकारने कायद्याचे पालन केले तर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. राजसाहेबांना कधीच सोडणार नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असंही अंबरनाथ येथील मनसेचे एहसामोद्दीन खान यांनी सांगितले आहे.  

राज ठाकरे अयोध्येला जाणार

पुण्यात आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

Web Title: I will never leave MNS; Muslim office bearers support MNS Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.