"...तोपर्यंत मी केस कापणार नाही"; भाजपाचे आमदार राम कदम यांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 06:40 PM2022-12-21T18:40:04+5:302022-12-21T18:42:01+5:30

BJP Ram Kadam : आमदार राम कदम यांनी केस न कापण्याची शपथ घेतली आहे.

i will not cut the hair bjp mla ram kadam took an oath | "...तोपर्यंत मी केस कापणार नाही"; भाजपाचे आमदार राम कदम यांनी घेतली शपथ

"...तोपर्यंत मी केस कापणार नाही"; भाजपाचे आमदार राम कदम यांनी घेतली शपथ

googlenewsNext

भाजपाचे आमदार राम कदम (BJP Ram Kadam) यांनी केस न कापण्याची शपथ घेतली आहे. "माझा घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ डोंगराळ आहे. लोकसंख्या वाढली. सिंगल घराची डबल घरं झाली. अनेकांनी स्वतःची घरं पाण्याविना चालवावं लागतंय. मुंबईत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचा तुटवडा आहे. तसाच तुटवडा घाटकोपरच्या डोंगराळ भागात आहे. लोकं निवडून देतात. पण, तरीसुद्धा त्यांना मुबलक पाणी देऊ शकत नाही. तर मग निवडून येण्याचा उपयोग काय?" असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

"डोंगरावरच्या प्रत्येक घराला मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ घेतो. मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळे पाणी मिळत नाही. त्यामुळं आमचं सरकार आहे. मंत्री महोदयांचा पाठपुरावा करून घेऊन मी ते उपलब्ध करून घेणार आहे. पण, नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेत आहे" असंही कदम यांनी म्हटलं आहे. तसेच पठाण चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर देखील भाष्य केलं आहे. 

"साधू संतांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. पण, कायदा घेतात घेऊ नये. तो कुणालाही नाही. साधू संतांची काय भूमिका आहे. हे पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता यांनी स्पष्टीकरण द्यावं. स्पष्टीकरण पारदर्शप्रमाणात दिलं तर साधू संतांमध्ये असलेला आक्रोश थांबेल" असं राम कदम यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: i will not cut the hair bjp mla ram kadam took an oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.