Narayan Rane: सर्व बाहेर काढणार, कोणालाही सोडणार नाही; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 07:19 AM2021-08-28T07:19:07+5:302021-08-28T07:42:41+5:30

Narayan Rane Warning to Shiv sena: पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानुसार जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे त्यांच्या नशिबी नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला.

I will not leave anyone; Narayan Rane's warning to Shiv Sena pdc | Narayan Rane: सर्व बाहेर काढणार, कोणालाही सोडणार नाही; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

Narayan Rane: सर्व बाहेर काढणार, कोणालाही सोडणार नाही; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेला आठवडाभर बोलतोय. त्यामुळे आवाज बसला आहे. तो बरा झाल्यावर पुन्हा बोलणार आहे. मागची सर्व प्रकरणे बाहेर काढणार. मग कोणालाही साेडणार नाही. काय करायचे असेल ते करा, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला.

शहरातील भाजप कार्यालयात पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते. आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कोणी सांगितले, रमेश मोरे यांची हत्या कशी झाली, यासह अनेक गोष्टी आपण बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानुसार जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे त्यांच्या नशिबी नाही, असा टोला त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी काय म्हटले? त्या वेळेला मी तेथे असतो तर आवाज आलाच असता, यात गुन्हा काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. जसे एखाद्या दरोडेखोराला अटक करतात, तशी अटक एका केंद्रीय मंत्र्याला केली. काय त्यांचा पराक्रम आहे. काय म्हणायचं याला? अशा शब्दांत त्यांनी राज्य शासनाची खिल्ली उडवली. या वेळी त्यांनी आपल्या घरावर हल्ला करणाऱ्यांवरही टीका केली. 

यात्रा नाही, केवळ बैठका
रत्नागिरीत मनाई आदेश जारी असल्याने भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे या दौऱ्यात जनआशीर्वाद यात्रेचे वाहन कोठेही नव्हते. परवानगी नाकारल्याने राणे यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांवर पुष्पवृष्टी केल्यानंतर गोळप, भाजप कार्यालय अशा दोनच बैठका घेतल्या. कोणताही जाहीर कार्यक्रम केला गेला नाही. 

पैसे जमवणे एवढाच शिवसेनेचा कार्यक्रम
nदेशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रात सुरू आहे. पैसे जमवणे एवढाच शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि पैसे आणून द्या, एवढीच त्यांची भूमिका 
आहे, अशी टीका राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
nसत्तेची मस्ती दाखवण्याची काही जणांची प्रवृत्ती आहे. आम्ही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. केंद्रात सत्तेत आहोत. भविष्यात राज्यातही सत्तेत येऊ. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि प्रशासनाने कोणाचेही आदेश आले, दबाव आला तरी कायदा साेडून वागू नये, असेही ते म्हणाले.

Web Title: I will not leave anyone; Narayan Rane's warning to Shiv Sena pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.