नाणार प्रकल्प रेटल्यास मी मंत्रिपद सोडेन - सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:49 AM2018-06-27T06:49:16+5:302018-06-27T06:49:19+5:30
नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. तेथील जनता आंदोलन करत असून, जनतेच्या संयमाची आणखी परीक्षा पाहणे योग्य नाही.
मुंबई : नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. तेथील जनता आंदोलन करत असून, जनतेच्या संयमाची आणखी परीक्षा पाहणे योग्य नाही. नाणार प्रकल्पाच्या कराराबाबत आम्हाला विश्वासात घेतले नाही. हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. नाणारबाबत सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींचा सामंजस्य करार सोमवारी झाला. दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
माध्यमांतूनच मला माहिती मिळाली. याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. केंद्र सरकारमध्ये अनंत गीते हे आमचे मंत्री आहेत. त्यांनाही याची कोणतीही कल्पना दिली गेली नाही.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री