तेही शब्द मागे घेतील ही अपेक्षा, रवी राणांच्या प्रतिक्रियेनंतर बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:03 PM2022-10-31T12:03:30+5:302022-10-31T12:06:09+5:30
गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले.
गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. आज आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू यांच्यासाठी वापरलेले शब्द पाठिमागे घेत असल्याचे जाहीर केले. यावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! आरोप घेतले मागे, म्हणाले...
"मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन. माझ्यासाठी कार्यकर्ते आणि जनता महत्वाची आहे. आम्ही उद्या बैठक घेणार आहे. आम्ही तिथे आमची भूमिका स्पष्ट करणार आहे, कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय आम्ही निर्णय घेत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.
"वाद हा त्यांच्यापासूनच सुरू झाला आहे. या आरोपावर मी शांत बसलो असतो तर माझी बदनामी झाली असती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. त्यांनी हा वाद मिटवला. या आरोपामुळे माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे हा वाद वाढला होता. यावर आता उद्या मी कार्यकर्त्यांसोूत बोलणार आहे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला!
गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. आज आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासाठी वापरलेले शब्द पाठिमागे घेत असल्याचे जाहीर केले.
"गेल्या आठ- दहा दिवसांपासून जो वाद सुरू होता त्या वादावर आज पडता पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वर्षा बंगल्यावर तीन तास चर्चा झाली. आमच्यात जे मतभेद होते त्यावर चर्चा झाली. मी आणि आमदार बच्चू कडू सरकार सोबत आहोत, बोलता बोलता तोंडातून काही वाक्य निघाली असतील तर ते वाक्य परत घेत आहे. बच्चू कडूंनीही आपले शब्द परत घ्यावेत, असंही आमदार रवी राणा म्हणाले.