सभागृहात एकनाथ शिंदेंआधी मी का बोललो? फडणवीसांनी सांगितले कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:33 PM2022-07-05T17:33:57+5:302022-07-05T19:40:36+5:30
भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे.
भाजपा शिवसेनेला मिळालेला जनादेश फसवून पळविण्यात आला. गेल्या अडीच वर्षांत काही झाले नाही. शिंदे अस्वस्थ होते, त्यांनी मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या आमदारांना कळत नव्हते की लोकांकडे जाऊन उद्या काय तोंड दाखविणार? कशाच्या आधारावर मते मागणार? ज्या हिंदुत्वावर पक्ष उभा राहिला, त्यावर बोलूही शकत नाही, यामुळे शिवसेनेमध्ये आमदारांनी उठाव केल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे. सरकार बाहेर बसून सरकार चालविता येत नाही, यामुळे नड्डा, शहा यांनी मला फोन करून सत्तेत सहभागी होण्यास सांगितले. म्हणून मी उप मुख्यमंत्री झालो. पक्षाने त्य़ा दिवशी घरी जा असे जरी सांगितले असते, तरी मी निमूटपणे घरी आलो असतो, असे फडणवीस म्हणाले.
आता मी एकनाथ शिंदे यांना यशस्वी मुख्यमंत्री करण्यासाठी झटणार आहे. त्यांच्यात तेवढी ताकद आहे. राज्याच विकास मविआने थांबविला होता. मोदी सरकारने त्यांना पाणी पाजले आहे. आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय झालीय हे तुम्ही पाहताय. भाजपा नेतृत्वाने चांगला निर्णय घेतला, असे फडणवीस म्हणाले.
सोन्याचा चमचा घेऊन काही जण जन्म घेतात. उद्धव ठाकरे फार काळ अधिवेशनात आले नाहीत, त्यांचा दोष नाहीय. बहुमत जिंकल्यावर मुख्यमंत्री पहिले भाषण करत नाहीत, ते शेवटी आभार मानतात. त्यामुळे उप मुख्यमंत्री म्हणून पहिला बोललो. ते देखील प्रथेप्रमाणे, असे फडणवीस म्हणाले. उद्या परवा बसून आम्ही मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरवू, आमच्यासाठी महत्वाचे म्हणजे शिंदेंचे ठाणे आणि माझे नागपूर होते, त्या लोकांना पहिल्यांदा भेटण्यासाठी आलो, असेही ते म्हणाले.