आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:29 AM2017-07-19T04:29:43+5:302017-07-19T04:29:43+5:30

ज्येष्ठ आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मन्मथ (१८) याने मंगळवारी सकाळी २० मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

IAS officer couple Milind and Manisha Mhaiskar's son commit suicide | आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ आयएएस अधिकारी दाम्पत्य मिलिंद व मनीषा म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मन्मथ (१८) याने मंगळवारी सकाळी २० मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
घटनेचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून, मन्मथचा मोबाइल सापडलेला नाही, असे मलबार हिल पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर दुपारी मन्मथचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला. चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक अधिकारी त्या वेळी उपस्थित होते.
मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत, तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. मरिन ड्राइव्ह परिसरात म्हैसकर दाम्पत्य राहते. पुण्यात शिकणारा मन्मथ दोन दिवसांपूर्वीच घरी आला होता. मंगळवारी सकाळी तो दरिया महलमध्ये राहत असलेला मित्र वशिष्ट अग्रवाल याच्या घरी जातो, असे सांगून निघाला. त्यानंतर सहा वाजून ५० मिनिटांनी त्याने दरिया महल या इमारतीत प्रवेश केला. सव्वासातच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसले आहे. सुरक्षारक्षकाने माहिती दिल्यानंतर पोलीस दाखल झाले. वशिष्टने मन्मथला ओळखले. त्याला जे. जे. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.

टोकाचे पाऊल का उचलले?
मन्मथने सेंट झेवियर्समध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सध्या तो पुण्याच्या सिम्बॉयसिस महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत होता. तो तेथे वसतिगृहात राहत होता. पुण्याला पाठविल्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त
मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासह अनेकांनी म्हैसकर दाम्पत्याचे सांत्वन केले. मन्मथचे आजोबा अरुण पाटणकर यांना शोक आवरणे कठीण झाले होते.

Web Title: IAS officer couple Milind and Manisha Mhaiskar's son commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.