पूजा खेडकरची फाईल महाराष्ट्रातून केंद्राकडे सरकली; कारवाईची शक्यता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 12:54 PM2024-07-19T12:54:44+5:302024-07-19T12:55:01+5:30

IAS Pooja Khedkar Update News: चमकोगिरीमुळे आधी केलेले सर्व कारनामे बाहेर पडले आहेत. त्यात मनोरमा खेडकरांना अटक झाली आहे. वडील दिलीप यांच्याविरोधात एसीबीने करोडोंची बेहिशेबी संपत्ती कशी जमविली याची चौकशी सुरु केली आहे.

IAS Pooja Khedkar's file moves from Maharashtra to Centre; The possibility of action increased after submiting report to upsc | पूजा खेडकरची फाईल महाराष्ट्रातून केंद्राकडे सरकली; कारवाईची शक्यता वाढली

पूजा खेडकरची फाईल महाराष्ट्रातून केंद्राकडे सरकली; कारवाईची शक्यता वाढली

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबाचे एकेक प्रताप समोर येऊ लागले आहेत. चमकोगिरीमुळे आधी केलेले सर्व कारनामे बाहेर पडले आहेत. त्यात मनोरमा खेडकरांना अटक झाली आहे. वडील दिलीप यांच्याविरोधात एसीबीने करोडोंची बेहिशेबी संपत्ती कशी जमविली याची चौकशी सुरु केली आहे. एकंदरीतच खेडकर कुटुंबावर सरकारी हातोडा पडणार आहे. याचवेळी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट आली आहे.  

महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने एक आठवडा तपास करून पूजा खेडकर यांची फाईल दिल्लीत पाठविली आहे. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागासोबतच केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीकडे हा अहवाल पाठविण्यात आला आहे. या समितीचा पुढील पंधरा दिवसात अहवाल अपेक्षित आहे. यानंतर खेडकर दोषी आढळल्या तर त्यांच्यावर नोकरीतून काढून टाकण्याची कारवाई होऊ शकते. 

महाराष्ट्र सरकारने महसूल, आरोग्य, पोलीस आदी विविध विभागांकडून केलेल्या चौकशीतून जी कागदपत्रे सापडली, जे काही निष्पन्न झाले ते या फाईलमध्ये जोडले आहे. याचबरोबर तथ्य लपवणे आणि खोटी माहिती दिल्याबद्दल व वागणुकीवरून फौजदारी कारवाईही होऊ शकते.

दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केले होते. यासंबंधात तक्रारही दिली होती. यावर कारवाई करण्यासाठी खेडकर यांचे जबाब नोंदवावे लागणार आहेत. पोलिसांनी यासाठी १८ जुलैला पुण्यात हजर राहण्याबाबत खेडकर यांना नोटीस पाठविली होती. त्या न आल्याने वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील तिसऱ्यांदा खेडकर यांच्या वाशिममधील शासकीय निवासस्थानी आल्या होत्या. आता खेडकर यांना २० जुलैला जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. 
 

Web Title: IAS Pooja Khedkar's file moves from Maharashtra to Centre; The possibility of action increased after submiting report to upsc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.