IAS Transfer : तुकाराम मुंढेंची अवघ्या महिन्याभरात बदली; राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 06:22 PM2023-06-02T18:22:34+5:302023-06-02T18:28:35+5:30

राज्य सरकारने तुकाराम मुंढेंसह 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.

IAS Transfer: Tukaram Mundhe transferred in just a month; Transfer of 20 IAS officers in the state... | IAS Transfer : तुकाराम मुंढेंची अवघ्या महिन्याभरात बदली; राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या...

IAS Transfer : तुकाराम मुंढेंची अवघ्या महिन्याभरात बदली; राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या...

googlenewsNext

Maharashtra IAS Officer Transfer : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यावेळी सरकारने 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात प्रसिद्ध IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची महिन्याभरात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे.  त्यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने शुक्रवारी (ता. 2 जून) 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या आहेत. यात प्रसिद्ध सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. मागच्या महिन्यातच आयएसएस तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता महिन्या भरातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे.  तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले आहेत.

कुणाची बदली कुठे?

1. सुजाता सौनिक, आयएएस (1987) मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
2. एस. व्ही. आर. श्रीनिवास, आयएएस (1991) एमएमआरडीए, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. लोकेश चंद्र, आयएएस (1993) BEST, मुंबई यांची महाडिस्काॅम, मुंबईचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. राधिका रस्तोगी, आयएएस (1995) यांची नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. आय ए. कुंदन, आयएएस (1996) महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती दिली आहे.
6. संजीव जयस्वाल, आयएएस (1996) पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सीईओ, म्हाडा, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. आशीष शर्मा, आयएएस (1997) एमसी, बीएमसी मुंबई यांना PS (2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
8. विजय सिंघल, आयएएस (1997) महाडिस्काॅम मुंबई येथून जनरल मॅनेजर BEST, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. अंशु सिन्हा, आयएएस (1999) सीईओ, खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अनुप कृ. यादव, आयएएस (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. तुकाराम मुंढे, आयएएस (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. डॉ. अमित सैनी, आयएएस (2007) सीईओ, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) एमसी, नाशिक एमसी, नाशिक यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. डॉ. माणिक गुरसाल, आयएएस (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मरीटाईम बोर्ड ( Maritime Board) सीइओ मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. कादंबरी बलकवडे, आयएएस (2010) कोल्हापूर यांची, मेडा पुणे येथे डिजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. प्रदिपकुमार डांगे, आयएएस (2011) जाईंट सेक्रेटरी मिशन डायरेक्टर SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.
17. शंतनू गोयल, आयएएस (2012) आयुक्त, (MGNREGS) नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. पृथ्वीराज बी.पी., आयएएस (2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. डॉ. हेमंत वसेकर, आयएएस (2015) सीईओ,(NRLM) मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
20. डॉ. सुधाकर शिंदे, आयआरएस (1997) यांची एएमसी, बीएमसी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


 

Web Title: IAS Transfer: Tukaram Mundhe transferred in just a month; Transfer of 20 IAS officers in the state...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.