तुमच्या फायद्याचं! फोनमध्ये ICE ठेवणं आहे अत्यंत गरजेचं, वाचा काय आहे हे?

By सागर सिरसाट | Published: August 24, 2017 04:47 PM2017-08-24T16:47:51+5:302017-08-24T16:50:14+5:30

फोनमध्ये ICE ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हे वाचून कदाचीत तुम्ही थोडे बुचकळ्यात पडला असाल की नक्की हे काय आहे...याबाबत आम्ही तुम्हाला आज तुमच्या अत्यंत फायद्याची माहिती देणार आहोत. 

ICE mumbai police app for safety | तुमच्या फायद्याचं! फोनमध्ये ICE ठेवणं आहे अत्यंत गरजेचं, वाचा काय आहे हे?

तुमच्या फायद्याचं! फोनमध्ये ICE ठेवणं आहे अत्यंत गरजेचं, वाचा काय आहे हे?

Next

मुंबई, दि. 24 - फोनमध्ये ICE ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हे वाचून कदाचीत तुम्ही थोडे बुचकळ्यात पडला असाल की नक्की हे काय आहे...याबाबत आम्ही तुम्हाला आज तुमच्या अत्यंत फायद्याची माहिती देणार आहोत. 

तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये रोज नवे नंबर सेव्ह करत असतात. नंबर सेव्ह करताना एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने किंवा त्याची आठवण राहील अशा एखाद्या नावाने अथवा तो काम करत असलेल्या कंपनीच्या वा अन्य कोणत्या नावाने करतात. पण यापुढे विश्वासार्ह किंवा जवळच्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करताना नावाआधी  ICE असं आवर्जून सेव्ह करा. ICE  म्हणजे 'इन केस ऑफ इमरजन्सी'. 

याचा फायदा काय - 
समजा तुम्ही कधी कोणत्या संकटात सापडला आहात किंवा तुमचा अपघात झाला असेल त्यावेळी घटनास्थळी पोहोचलेले पोलीस सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ICE नावाने सेव्ह असलेले नंबर सर्च करतात. जे नंबर  ICE नावाने सेव्ह असतील त्यांना तुमच्याबाबत माहिती दिली जाते. त्यामुळे तुम्ही संकटात असल्याची माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तींना लगेच मिळते. 
 काय आहे आयसीई-
‘इन केस ऑफ इमरजन्सी ‘ ( आयसीई) हे अॅप देखील उपलब्ध असून मुंबई पोलिसांनी ते तयार केलं आहे. प्ले-स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. याद्वारे चोरी, अपघात , दहशतवादी हल्ले , आग , ट्रेन अपघात आदींबद्दलही माहिती आपल्याला थेट पोलिसांना कळवता येते. याचं वैशिष्ट्य म्हणजे तुमचा अॅलर्ट सरळ पोलिसांकडे जातो. आपण ज्या विभागात असू त्या विभागातील पोलिस स्टेशन्स तसेच पोलिस व्हॅन्समध्ये या अॅपचा अॅलर्ट पोहचतो. परिणामी तुमच्या आसपास असलेली पोलिस व्हॅन लागलीच तुमच्या मदतीला पोहचू शकते. 

  

Web Title: ICE mumbai police app for safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.