आयकॉन्सची यशोगाथा प्रेरणादायी
By Admin | Published: September 5, 2014 02:38 AM2014-09-05T02:38:56+5:302014-09-05T02:38:56+5:30
‘लोकमत’ने प्रकाशित केलेले आयकॉन्स ऑफ सोलापूर’ हे कॉफी टेबल बुक अतिशय देखणो असून, यामध्ये समाविष्ट असलेल्या आयकॉन्सनी शून्यातून विश्व निर्माण केले.
‘लोकमत आयकॉन्स ऑफ सोलापूर’च्या प्रकाशन सोहळ्यात उज्ज्वल निकम यांचे गौरवोद्गार : विजय दर्डा म्हणाले, देश घडविणा:यांचा केला सन्मान!
सोलापूर : ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले आयकॉन्स ऑफ सोलापूर’ हे कॉफी टेबल बुक अतिशय देखणो असून, यामध्ये समाविष्ट असलेल्या आयकॉन्सनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांची यशोगाथा युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी गुरुवारी येथे काढले. अॅड. निकम यांच्या हस्ते शानदार समारंभात पुस्तकाचे प्रकाशन झाले.
‘आयकॉन्स ऑफ सोलापूर’मध्ये जिल्ह्यातील उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला क्षेत्रतील आदर्श व्यक्तींनी संघर्ष करत मिळवलेल्या यशाचा धांडोळा घेण्यात आला आहे. ‘लोकमत’ने अतिशय कल्पकतेने निर्माण केलेल्या या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन आणि एडिटर इन चीफ खासदार विजय दर्डा आवजरून येथे आले होते. ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, युनिटी मल्टिकॉन्सचे कफील मौलवी, स्वप्निल डेव्हलपर्सचे अमोल सोनकवडे, ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे उपस्थित होते. अॅड. निकम म्हणाले, सोलापुरातील कर्तबगारांचा शोध घेणारे हे पुस्तक प्रकाशित करताना मला विशेष आनंद होत आहे. वकिली व्यवसायामुळे माझा प्रसारमाध्यमांशी संबंध आहे. वृत्तपत्र चालविणो हा व्यवसाय आहे आणि पत्रकारिता हा धर्म आहे. हा व्यवसाय करताना ‘लोकमत’ने त्याचा धंदा होऊ दिला नाही. ‘लोकमत’ने आजवर समाजमन सुसंस्कृत करणा:या बातम्या देऊन प्रगतीची घोडदौड केली, याबद्दल खासदार दर्डा यांचे मी कौतुक करतो.
खासदार दर्डा म्हणाले, ‘लोकमत’च्या युवा पिढीने ‘आयकॉन्स ऑफ सिटीज्’ची कल्पना मांडली आणि ती सत्यात उतरवली. या तरुण भारतास यंग इंडिया बनविण्याचे काम समाजातील अनेक मान्यवरांनी केले. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. इतिहासात त्यांची नोंद झाली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. पुणो, मुंबई, औरंगाबादनंतर आज आयकॉन्स ऑफ सोलापूरचे प्रकाशन होत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, आयुष्यात जी व्यक्ती प्रेरणा देत असते, तीच खरी आयकॉन असते. युवा पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी समाजाला आयकॉनची गरज आहे. ‘लोकमत’बरोबर मी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. मी ‘लोकमत’ युवा मंचची ब्रँड अॅम्बॅसिडरही होते, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)