आयसीटी शिक्षकांचा ठिय्या
By admin | Published: March 9, 2017 01:23 AM2017-03-09T01:23:20+5:302017-03-09T01:23:20+5:30
राज्यातील आयसीटी योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या संगणक निदेशक म्हणजेच, शिक्षकांना पदनिर्मिती करून कायम सेवेत घ्या, अशी मागणी करत, महाराष्ट्र राज्य
मुंबई : राज्यातील आयसीटी योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या संगणक निदेशक म्हणजेच, शिक्षकांना पदनिर्मिती करून कायम सेवेत घ्या, अशी मागणी करत, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने मंगळवारी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केले. २८ फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांना डिजिटल इंडियांतर्गत कायम सेवेत घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.
संघटनेचे सरचिटणीस जीवन सुरूडे म्हणाले की, ‘राज्यातील ८ हजार संगणक निदेशकांमधील अडीच हजार निदेशकांचा कंपन्यांसोबतचा करार संपला आहे. त्यामुळे निदेशकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. माध्यमिक शाळेतील शासनाच्या डिजिटल महाराष्ट्र योजनेतील डिजिटल स्कूल, विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान देणे, ई-लर्निंग अशी विविध कामेही निदेशकांअभावी ठप्प पडली आहेत.’ (प्रतिनिधी)