कर्नाळा अभयारण्यात ओळखपत्र सक्तीचे

By admin | Published: February 3, 2016 03:34 AM2016-02-03T03:34:24+5:302016-02-03T03:34:24+5:30

पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांना यापुढे ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे. सध्या सहा सीसीटीव्हींद्वारे वन अधिकाऱ्यांकडून नजर ठेवली जाते

Identity card in Karnala Wildlife Sanctuary | कर्नाळा अभयारण्यात ओळखपत्र सक्तीचे

कर्नाळा अभयारण्यात ओळखपत्र सक्तीचे

Next

जितेंद्र कालेकर,  ठाणे
पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांना यापुढे ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे. सध्या सहा सीसीटीव्हींद्वारे वन अधिकाऱ्यांकडून नजर ठेवली जाते. यात वाढ करून २० सीसीटीव्हींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. ‘इसिस’च्या कथित अतिरेक्यांनी या भागाची ‘रेकी’ केल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.
कर्नाळा ओसाड आणि निर्मनुष्य परिसर असल्यामुळे या भागात ‘इसिस’चा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा बेत होता. मुदब्बीर शेखचा साथीदार रिझवानच्या चौकशीत ही बाब उघड झाल्यानंतर इथल्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. गेल्या दोन दिवसांत मुंबई एटीएस आणि पनवेल ग्रामीण पोलिसांनी वन अधिकाऱ्यांची चौकशी केली. इथली रेकी होईपर्यंत वन कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही? अशी विचारणा झाल्यानंतर एखादी व्यक्ती येथे आल्यानंतर तो कोण आहे हे कसे ताडणार? असा सवाल अधिकाऱ्यांनी केला. गेल्या महिनाभर या ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याचे वन अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या सूचनेनंतर या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. राज्य शासनाचा निधी उपलब्ध झाल्यानंतर आणखी तीन लाख रुपये खर्च करून १५ ते २० सीसीटीव्ही लावण्यात येतील.
एटीएसचे अधिकारी झाले प्रवचनकार१ठाणे : ‘इसिस’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेकलेल्या जाळ््यात भारतामधील तरुणांनी सापडू नये, याकरिता मौलाना आणि इमामांच्या मदतीने मस्जिद, मदरसा,शाळा, तसेच महाविद्यालयातून तकरीब अर्थात प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करण्याचा उपक्रम एटीएस ने सुरू केला आहे.
२इसिससारख्या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभने दिली जातात. कोणत्याही प्रलोभनांना शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी बळी न पडता, खऱ्या इस्लाम धर्माची ओळख करून देण्याकरिता एटीएसने पुढाकार घेतला आहे.
३भिवंडीत १४७ मस्जिदमधील मौेलानांची आणि २० मदरशांमधील इमामांची भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मौलानांच्या माध्यमातून तरुणांना विश्वासात घेण्यात आले. गेले तीन महिने हा उपक्रम सुरू असल्याचे दाभाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ४ इंटरनेट हाताळताना काय काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले जात आहे. पोलिसांच्या फेसबुक अकाउंटवरून तरुण तरुणींशी संपर्क साधून, त्यांनी कोणाला ‘लाइक’ आणि ‘अनलाइक’ केले याबाबतही मार्गदर्शन केले आहे.
५ इसिसकडून दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना कसे प्रवृत्त केले जाते, त्यापासून कोणते धोके आहेत, या पूर्वी दहशतवादी कारवायांत सहभाग घेतलेल्यांना त्यांचे कोणते परिणाम भोगावे लागले, याबाबतही मार्गदर्शन मिळते.

Web Title: Identity card in Karnala Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.