नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये झालेल्या रहस्यमय स्फोटाची उकल करणार 'आयईडी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 07:41 PM2017-10-07T19:41:15+5:302017-10-07T19:42:12+5:30

पुणे येथील 'आयईडी' इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अधिकारी स्फोटामगील कारण शोधण्यासाठी दाखल झाले आहेत.

'IED' to seize the mysterious explosion in Tibetan market in Nashik | नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये झालेल्या रहस्यमय स्फोटाची उकल करणार 'आयईडी'

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये झालेल्या रहस्यमय स्फोटाची उकल करणार 'आयईडी'

Next

नाशिक - येथील पालिका तिबेटीयन मार्केटमध्ये पहाटे झालेल्या स्फोटाची धागेदोरे व कारण पोलिसांपुढे आले नसून, केंद्राच्या  पुणे येथील 'आयईडी' इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अधिकारी स्फोटामगील कारण शोधण्यासाठी दाखल झाले आहेत. सुधारित स्फोटक द्रव्य आणि उपकरणाच्या उपलब्धतेची शक्यता लक्षात घेत हे 'आयईडी' चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राष्ट्रविरोधी घटकांकरिता सुधारीत स्फोटक वस्तू या ठिकाणी वापरले गेले आहेत की काय या शंकेचे निरसन सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून या पार्श्वभूमीवर  पथक नाशिकला पोहोचले आहे. सुधारित विस्फोटक वस्तू व द्रव्यचे काही संशयास्पद अवशेष नाशिकच्या स्फोटामध्ये आढळतात का? किंवा अशा काही वस्तूंच्या वापरातून किंवा साठ्यातून स्फोट झाला की काय ? आदी प्रश्नांच्या दिशेने पथकाचे अधिकारी चाचपणी करत पुरावे आणि महत्वाची निरीक्षणे नोंदविणार आहेत. 

एकूणच नाशिकच्या स्फोटामागील 'तीव्रता' 'आयईडी'च्या येण्याने वाढली आहेत. घटनास्थळ निर्मनुष्य करण्यात आला असून प्रसारमाध्यमांना ही या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Web Title: 'IED' to seize the mysterious explosion in Tibetan market in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.