ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र...; शरद पवारांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 04:34 PM2023-04-16T16:34:08+5:302023-04-16T16:35:23+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे हा दबाव कुठल्या प्रकारचा आहे? यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

If anyone wants to go with BJP, it is their personal decision, Sharad Pawar clarified, Sanjay Raut's criticism of BJP | ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र...; शरद पवारांचं मोठं विधान

ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र...; शरद पवारांचं मोठं विधान

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत असताना उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. राज्यातील राजकारण आणि महाविकास आघाडी यावर बैठकीत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असून त्यातून विरोधी पक्षातील नेते फोडण्याचं काम सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

संजय राऊत यांनी सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमचे आमदार फोडले. आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केला कसे नेते रडत होते. आम्हाला तुरुंगात जायचं नाही तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरत आहेत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे हा दबाव कुठल्या प्रकारचा आहे?  यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे. तो त्यांचा वयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणालेत असं राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, पवार कुटुंबियांना अशा पद्धतीच्या नोटीस आल्या आही. त्यांच्या घरातील कुटुंबातील घरावर धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आहे. आम्ही त्यातून भरडून निघालो मात्र आम्ही झुकणार नाही. शरद पवार यांनी ते सांगितलं की आम्ही झुकणार नाही की पक्ष म्हणून त्यात जाणार नाही असंही सांगण्यात आले आहे. भाजपा सीझन २ च्या मागे लागलाय, परंतु त्यात त्यांना यश मिळणार नाही असा टोला राऊतांनी लगावला. 

महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा
छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेनंतर आता नागपूरात ही वज्रमूठ सभा होत आहे. गेल्या सभेत नाना पटोले यांच्या गैरहजेरीने मविआतील मतभेदाची चर्चा समोर आली होती. त्यानंतर अलीकडेच नागपूरातील सभेत अजित पवार उपस्थित राहतील का असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर अजित पवार यांनी मी सभेला जाणार आहे असं स्पष्ट केले. 

Web Title: If anyone wants to go with BJP, it is their personal decision, Sharad Pawar clarified, Sanjay Raut's criticism of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.