2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 10:18 AM2018-03-26T10:18:45+5:302018-03-26T10:22:40+5:30

2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. 

If BJP comes to power in 2019, it will be the last election - Prithviraj Chavan | 2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल - पृथ्वीराज चव्हाण 

2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल - पृथ्वीराज चव्हाण 

Next
ठळक मुद्दे2019 मध्ये भाजपा सत्तेत आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल देश हुकूमशाहीत लोटला जाईलघोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत

मुंबई: 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूमीवर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे. 
राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल. देश हुकूमशाहीत लोटला जाईल, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले,  विधानसभेत सभापतीविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर 14 दिवसांत निर्णय येणे आणि त्यानंतर सात दिवसात सभागृहात चर्चा घेवून मतदान घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, बहुमत असलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने चर्चाच नाकारली. उलट विधानसभेच्या कामकाजाच्या सूचित विषय नसताना मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विश्‍वास ठराव मांडतात आणि कोणतीही चर्चा न करता तो संमत करून अधिवेशन गुंडाळले जाते, ही हुकमशाहीची सुरुवात नाही तर काय, असा प्रश्‍नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितांना केला. 
कॉंग्रेसच्या नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला घेराव घातले आणि सांगितले की न्याय व्यवस्थेची सुद्धा सरकार कदर करत नाही. मात्र, याकडे कानाडोळा केला जात आहे. दिल्लीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणा-या लोकांची अडवणूक करण्यात येत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. याचबरोबर, देशात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत. अशा बँकांना वाचविण्यासाठी सर्व सामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात कोणतीही सूचना न देता वळती करण्याचा कायदा या देशात आणण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला.  

Web Title: If BJP comes to power in 2019, it will be the last election - Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.