खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By admin | Published: April 4, 2016 02:18 PM2016-04-04T14:18:58+5:302016-04-04T14:21:19+5:30

मुख्यमंत्र्यांनी 'भारत माता की जय' वक्तव्यावर ठाम राहत खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही असं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे

If the chair is gone, you will not apologize - Chief Minister Devendra Fadnavis | खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ४ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'भारत माता की जय' बोलण्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घालत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत खुर्ची गेली तरी माफी मागणार नाही असं विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. 
 
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधक जाणूनबुजून गोंधळ घालत आहेत, मतांचं राजकारण करत आहेत असा आरोप केला आहे. मुख्यमंत्री पद असो किंवा नसो 'भारत माता की जय' बोलावेच लागेल. 'भारत माता की जय' कालदेखील म्हंटलं होतं आजही म्हणू असंदेखील मुख्यमंत्री बोलले आहेत. 
 
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना आरएसएस कार्यकर्ता म्हणून बोललात की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून असा खोचक सवालही यावेळी विचारला. मी जाती धर्मावर बोललेलो नाही, देशाबद्द्ल बोललेलो आहे. ज्या लोकांचं देशावर प्रेम नाही, जे लोक मुद्दामुन वाद वाढवत आहेत त्यांना उद्देशून बोललो असल्यांच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना 'भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-यांना देशात राहण्याचा हक्क नसल्याचं' केलेल्या वक्तव्यावरुनदेखील वाद निर्माण झाला होता. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला होता. 
 

Web Title: If the chair is gone, you will not apologize - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.