शेतक-यांनी कर्ज न भरल्यास सरकारच कर्जबाजारी होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:50 AM2017-10-30T03:50:46+5:302017-10-30T03:51:02+5:30

शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल

If the farmers do not pay the loan, the government will be debt-free! | शेतक-यांनी कर्ज न भरल्यास सरकारच कर्जबाजारी होईल!

शेतक-यांनी कर्ज न भरल्यास सरकारच कर्जबाजारी होईल!

Next

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुक्ताईनगर येथे केले.
३० दिवसांत दुष्काळाबाबत घोषणा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मुक्ताई साखर कारखान्याचा चौथा गळीत हंगाम व १२ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी त्यांच्या हस्ते झाला.
राज्यात अनेक भागांत पाऊस कमी झाला आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३० दिवसांत शासनाला अहवाल प्राप्त होताच दुष्काळाची घोषणा करण्यात येईल. दुष्काळी भागाला त्याचा लाभ दिला जाईल, असेही ते म्हणाले. शेतकºयांकडे १४ हजार कोटी रुपये वीजबिल थकीत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतीपूरक उद्योग व तंत्रशुद्ध शेतीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कर्जमाफी संदर्भातील रक्कम वळविण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच शेतकºयांना पैसे मिळतील, असेही त्यांनी सांगितले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

Web Title: If the farmers do not pay the loan, the government will be debt-free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.