दोषी आढळलो, तर वंचितच्या नेत्यांच्या समोर स्वत:चे हात कलम करेन - बच्चू कडू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 07:55 AM2022-04-28T07:55:40+5:302022-04-28T07:56:01+5:30

रस्त्याच्या कामात अपहार, राज्यमंत्री कडू यांच्याविरुद्ध गुन्हा

If found guilty, I will cut my own hands in front of the VBA leaders - Bachchu Kadu | दोषी आढळलो, तर वंचितच्या नेत्यांच्या समोर स्वत:चे हात कलम करेन - बच्चू कडू 

दोषी आढळलो, तर वंचितच्या नेत्यांच्या समोर स्वत:चे हात कलम करेन - बच्चू कडू 

googlenewsNext

अकोला : रस्ते कामात अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर अखेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत वंचितने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती.

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जि.प.कडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलांसाठी प्रस्ताव मागितले हाेते. त्यानुसार  १० मार्च २०२१ रोजी झालेल्या  जि.प.च्या  सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन  प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आला होता. मात्र, जि.प.च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले. अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर पालकमंत्री कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळविला. शासनाच्या १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीने ३ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे वंचित तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत याचिका न्यायालयात दाखल केली होती.  न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४०५ (फौजदारीपात्र न्यासभंग, ४०९, लोकसेवकाने फसवणूक करणे), ४२०(फसवणूक), ४६८(खोटे कागदपत्रे तयार करणे), ४७१(खाेट्या कागदपत्रांचा वापर करणे) नुसार गुन्हा दाखल केला. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी फाैजदारी संहिता प्रकिया १५६ (३) च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

‘कामात कुठेही अनियमितता नाही’
हा चुकीचा निर्णय आहे. या निर्णयाविराेधात सर्वाेच्च न्यायालयापर्यंत दाद मागणार आहाेत, असे स्पष्ट करीत ‘या प्रकरणात आपण दोषी आढळलो तर वंचितच्या कुठल्याही नेत्यांच्या समाेर स्वतःचे हात कलम करेन’, असा पुनरुच्चार पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला. समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी यावर भाष्य केले आहे.

Web Title: If found guilty, I will cut my own hands in front of the VBA leaders - Bachchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.