गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाला वेग, मग डॉ दाभोलकरांच्या का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 06:53 PM2018-08-17T18:53:51+5:302018-08-17T18:54:16+5:30

तपासप्रकरणी दिरंगाई होत असून याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (20) जवाब दो आंदोलन छेडणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत देखील हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

If Gauri Lankesh murder investigation iS faster then why not Dr. Dabholkar ? | गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाला वेग, मग डॉ दाभोलकरांच्या का नाही ?

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासाला वेग, मग डॉ दाभोलकरांच्या का नाही ?

Next
ठळक मुद्देपुण्यात पाचव्या स्मृतीदिनानिमित्त जवाब दो आंदोलन

पुणे :  डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 आॅगस्टला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. अद्यापही पोलीस प्रशासनाला त्यांच्या मारेक-यांच्या तपासाची दिशा सापडलेली नाही. दुसरीकडे कर्नाटक सरकारने गौरी लंकेश खून तपासात मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून महाराष्ट्र शासन व सीबीआयला अपयशाला सामोरे का जावे लागत आहे. असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. तपासप्रकरणी दिरंगाई होत असून याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी (20) जवाब दो आंदोलन छेडणार असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत देखील हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

        पुणे, नागपूर, औरंगाबाद सह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात अभिनेते प्रकाश राज, ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर, महात्मा गांधीचे पणतु तुषार गांधी आणि ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे सहभागी होणार आहेत. साने गुरुजी स्मारक येथे विविध मान्यवर मनोगत व्यक्त करणार असून यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय क लबुर्गी, मुक्ता दाभोलकर यांहा समावेश आहे. अभिव्यक्ती के खतरे यावर प्रकाश राज व पालेकर विचार व्यक्त करणार असून याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम और निरास या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच इचलकरंजी येथील स्मिता पाटील कलापथक - राष्ट्रसेवा दल यांच्यावतीने  ‘‘गांधींचं करायचं काय?’’ हे एक अंकी नाटक सादर होणार आहे.

       महाराष्ट्राबरोबरच केरळ, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. याबरोबरच आॅल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या एकत्रित प्रयत्नांतून 20 आॅगस्ट रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाभोलकरांचे वैज्ञानिक विचार समाजापर्यंत पोहचविले जाणार आहे. 

      उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासन व सरकारला अनेकदा फटकारुन देखील तपासात प्रगती होत नाही. हे खेदजनक असल्याचे नमूद केले आहे. यावेळी अंनिसने लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त केली.  मागील ५९ महिने झाले आम्ही डॉ दाभोलकरांचा खून झाला त्या पुलावर जमतो.मात्र एकदाही पुणे जिल्ह्यातील आमदार किंवा खासदार इथे आलेले नाहीत. पालकमंत्री गिरीश बापट इतक्या जवळ राहतात मात्र त्यांनीही याकडे अद्याप लक्ष दिले नाही, ते पालकमंत्री असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे असेही मत मांडण्यात आले. 

Web Title: If Gauri Lankesh murder investigation iS faster then why not Dr. Dabholkar ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.