सेना-भाजपाची गितेंना आॅफर

By admin | Published: November 5, 2014 04:23 AM2014-11-05T04:23:01+5:302014-11-05T04:23:01+5:30

भाजपाचेही आमदार बाळासाहेब सानप व विजय साने यांनी गिते यांच्याशी गुफ्तगू करीत पक्षश्रेष्ठंींशी प्रवेशाबाबत चर्चा केली.

If Gitanja is the army-BJP | सेना-भाजपाची गितेंना आॅफर

सेना-भाजपाची गितेंना आॅफर

Next

नाशिक : प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार वसंत गिते यांची शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन ‘हे ठाकरे काय आणि ते ठाकरे काय’ अशी समजूत घालीत शिवसेनेत येण्याची खुली आॅफर दिली, तर भाजपाचेही आमदार बाळासाहेब सानप व विजय साने यांनी गिते यांच्याशी गुफ्तगू करीत पक्षश्रेष्ठंींशी प्रवेशाबाबत चर्चा केली.
वसंत गिते यांनी सोमवारी वैयक्तिक व कौटुंबिक कारणास्तव सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर ते आता मनसेलाही सोडचिठ्ठी देतील अशी अटकळ बांधून शिवसेना, भाजपाने त्यांच्याभोवती गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी गिते यांची भेट घेऊन ‘जुने घर, जुना वाडा आपलाच आहे,’ असे सांगत शिवसेनेत येण्याची आॅफर दिली. गिते यांनी सेनेला थेट ‘होकार’ दिलेला नसला, तरी स्पष्टपणे ‘नकार’ही दिलेला नाही; मात्र समर्थकांशी बोलू एवढे आश्वासन त्यांनी दिले. सेनेची मंडळी गिते यांना भेटून बाहेर पडत नाही तोच भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, विजय साने यांनीही गिते यांची पुन्हा भेट घेऊन भाजपाच्या प्रवेशाची चर्चा केली.

Web Title: If Gitanja is the army-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.