गाउन घातलात तर दंड!
By admin | Published: December 9, 2014 02:45 AM2014-12-09T02:45:21+5:302014-12-09T10:02:52+5:30
‘सार्वजनिक ठिकाणी गाउन (मॅक्सी) घातल्यास 500 रुपये दंड ठोठावला जाईल..!’ हा कोणत्याही खाप पंचायतीचा फतवा नाही.
Next
गोठीवलीत ‘ताईगिरी’ : सार्वजनिक ठिकाणी ड्रेसकोडची सक्ती
नवी मुंबई : ‘सार्वजनिक ठिकाणी गाउन (मॅक्सी) घातल्यास 500 रुपये दंड ठोठावला जाईल..!’ हा कोणत्याही खाप पंचायतीचा फतवा नाही. ही आहे, पनवेलच्या गोठीवलीतल्या महिला मंडळाने केलेली सक्ती. गाउन घालून परिसरात फिरल्यास दंड करण्यात येईल, असा अजब नियम या इंद्रायणी महिला मंडळाने केला आहे.
गोठीवलीतील ग्रामस्थ मंडळाच्या फलकावरच ही सूचना लावण्यात आली आहे. मंडळाचा नियम धुडकावणा:या महिलेला 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. गोठीवली गावठाण परिसरात राहणा:या सर्व महिलांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोठीवली गावठाण क्षेत्रत मूळ ग्रामस्थांसह विविध भाषिक नागरिक मोठय़ा संख्येने राहतात. अशा कुटुंबातील महिलांमध्ये गाउन वापरण्याचे प्रमाण अधिक आहे.
काही महिला गाउन परिधान करूनच परिसरात वावरतात. त्यमुळे त्यांची छेडछाड होण्याची शक्यता असते, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महिला मंडळाच्या सदस्यांचे म्हणणो आहे.
महिला मंडळाच्या या हुकूमशाहीला गोठीवली ग्रामस्थ मंडळाने देखील सहमती दर्शवली आहे. दोन वर्षापूर्वी देखील याच मंडळाने असा निर्णय घेतला होता. परंतु त्यावेळी स्थानिक महिलांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता, मात्र आता हा नियम गांभीर्याने पाळण्याचा निर्णय इंद्रायणी महिला मंडळाने घेतला आहे.(प्रतिनिधी)
दुसरी निर्भया नको
गाउन घालणा:या महिलांकडे पुरुषांच्या वाईट नजरा असतात. यातून दिल्लीतल्या निर्भयासारखी दुसरी घटना घडू नये, म्हणून ही बंदी घातली आहे. हा निर्णय देशभरात लागू होणो गरजेचे आहे.
- लक्ष्मी पाटील, इंद्रायणी मंडळ अध्यक्ष
व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा
ड्रेसकोडविषयी सक्ती हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. नागरिकांवर बंधन घालणो योग्य नसून, हा प्रकार निंदनीय आहे.
- रमाकांत म्हात्रे,
माजी विरोधी पक्षनेते