खडसे आडनावामुळे मला डावललं जात असेल तर...; भाजपा खासदार रक्षा खडसेंची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:51 AM2023-10-21T10:51:33+5:302023-10-21T10:52:04+5:30

आज महिला म्हणून ती कुटुंबाच्या पाठिंब्यावर आणि कुणीतरी तिच्या मागे उभे राहिले तर पुढे जाऊ शकते असं चित्र कुठेतरी बदलले पाहिजे असंही रक्षा खडसेंनी म्हटलं.

If I am being rejected because of Khadse last name...; Displeasure of BJP MP Raksha Khadse | खडसे आडनावामुळे मला डावललं जात असेल तर...; भाजपा खासदार रक्षा खडसेंची नाराजी

खडसे आडनावामुळे मला डावललं जात असेल तर...; भाजपा खासदार रक्षा खडसेंची नाराजी

जळगाव – भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसेंनी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी भाजपात राहण्याचा निर्णय घेतला. रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. परंतु आता लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना खासदार रक्षा खडसेंनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानं पक्षात रक्षा खडसेंना डावलले जातंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, खडसे आडनावामुळे आणि सगळी परिस्थिती पाहता माझ्यावर मी पक्षांतर करणार आहे असा आरोप केला जातो. परंतु मी याआधीही माझे मत भरपूरवेळा मांडले आहे. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असलो तरी त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि माझा पक्ष वेगळा आहे. आज तुम्ही कुणावरची जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही कुठे असले पाहिजे. त्यांचे विचार त्या पक्षाशी जुळतात आणि माझे विचार या पक्षाशी जुळतात म्हणून मी इथं आहे. माझे व्यक्तिगत काम किंवा मी १० वर्षात रावेर लोकसभा मतदारसंघात केलेले काम, लोकांशी जनसंपर्क आहे. तुम्ही फक्त खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मी महिला म्हणून ज्या परिस्थितीत मी २०१४ ची निवडणूक लढली हे सर्व जगाला माहिती आहे. ती लपवण्यासारखी परिस्थिती नाही. मी कुठल्या परिस्थितीतून आले सर्वांना माहिती आहे. केवळ खडसेंची सून म्हणून माझी ओळख ठेवली नाही. माझे व्यक्तिगत कामही ग्राऊंड पातळीवर जाऊन करायचा प्रयत्न केला आहे. वैयक्तिक जनसंपर्क वाढवला आहे. रक्षा खडसे नाव लोकांमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. आज महिला म्हणून ती कुटुंबाच्या पाठिंब्यावर आणि कुणीतरी तिच्या मागे उभे राहिले तर पुढे जाऊ शकते असं चित्र कुठेतरी बदलले पाहिजे असंही रक्षा खडसेंनी म्हटलं.

दरम्यान, कुटुंबाचा पाठिंबा असतो, परंतु त्या महिलेचे व्यक्तिगत काम असते, तिचेही स्थानिक पातळीवर काम असते आणि ते मी करायचा प्रयत्न केला आहे. काम करताना माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मी ते मान्य करते. पण मी त्यातून शिकले. मी पद घेऊन घरात बसले नाही. पदाचा दुरुपयोग करायचा प्रयत्न केला नाही. मागच्या १० वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहचायचा प्रयत्न केला. तिथल्या अडीअडचणी ऐकून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पण फक्त खडसे नाव आहे त्यामुळे माझ्या कामाचा विचार न करता मला बाजूला कसं काढायचं हे चित्र जिल्ह्यात उभे राहत असेल तर ते चुकीचे आहे अशी खंत खासदार रक्षा खडसेंनी व्यक्त केली.

Web Title: If I am being rejected because of Khadse last name...; Displeasure of BJP MP Raksha Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा