मनसेवाले गुंड तर मी पण अलाहाबादचा गुंड - काटजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 06:24 PM2016-10-19T18:24:42+5:302016-10-19T18:37:02+5:30
असहाय्य कलाकारांना कशाला लक्ष्य करतात, तुमच्यात एवढीच हिम्मत असेल तर माझ्याकडे या तुमच्यासाठी माझा दंडुका तयार आहे. माझ्यासोबत 'दंगल' करा मग जगाला बघुद्या कोण किती मोठा गुंड
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते गुंड आहेत असं ट्विट करत ते गुंड असतील तर मी सुद्धा अलाहाबादचा गुंड आहे. असहाय्य कलाकारांना कशाला लक्ष्य करतात, तुमच्यात एवढीच हिम्मत असेल तर माझ्याकडे या तुमच्यासाठी माझा दंडुका तयार आहे. माझ्यासोबत 'दंगल' करा मग जगाला बघुद्या कोण किती मोठा गुंड आहे'. असं ट्विट त्यांनी केलं आहे.
तुम्ही तरी अरबी समुद्राचं खारं पाणी प्यायला आहात पण मी तर संगम नदीचं पाणी प्यायलोय असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेला एकप्रकारे आव्हानंच दिलं आहे.
पाक कलाकार असल्यामुळे 'ए दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची तंबी मनसेनी दिली आहे. त्या पार्श्वभुमीवर काटजू यांनी हे ट्विट केलं.Why do MNS attack helpless people? If u are brave, come to me. I've a danda waiting for u and is getting impatient https://t.co/0PLECoc4iC
— Markandey Katju (@mkatju) October 19, 2016
MNS people are goondas who have drunk the salt water of the Arabian Sea. I am an Allahabadi goonda, who has drunk the water of the Sangam
— Markandey Katju (@mkatju) October 19, 2016
. So instead of showing your bravery on those helpless artists, come have a dangal with me, and let the world see who is a bigger goonda
— Markandey Katju (@mkatju) October 19, 2016
दरम्यान, ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.