जस्टीन बिबर मराठी असता तर....

By admin | Published: May 11, 2017 04:20 PM2017-05-11T16:20:38+5:302017-05-11T16:21:38+5:30

बिबर म्युझिकल कॉन्सर्ट संपल्यानंतर लगेचच दुस-या देशात रवाना झाला असला तरी, अजूनही चाहत्यांवरचा बिबर फिव्हर उतरलेला नाही.

If Justin Bieber was a Marathi ... | जस्टीन बिबर मराठी असता तर....

जस्टीन बिबर मराठी असता तर....

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - आंतरराष्ट्रीय पॉपस्टार जस्टीन बिबर म्युझिकल कॉन्सर्ट संपल्यानंतर लगेचच दुस-या देशात रवाना झाला असला तरी, अजूनही चाहत्यांवरचा बिबर फिव्हर उतरलेला नाही. जस्टीन मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याचे पारंपारिक मराठमोळया पद्धतीने स्वागत झाले नाही. पण मुंबईतील बिबरच्या चाहत्यांनी तो मराठी राजा असता तर कसा दिसला असता त्याचा फोटो टि्वटरवर शेअर केला आहे. 
 
या फोटोमध्ये बिबरच्या डोक्यावर पारंपारिक भगवा फेटा आहे. कानात बाली, गळयामध्ये राजेशाही हार आणि भारदार मिशा दाखवल्या आहेत. जस्टीनने त्याचा हा फोटो कदाचित पाहिला असेल किंवा नसेल पण यानिमित्ताने जस्टीनची भारतातील लोकप्रियता दिसून आली. बुधवारी रात्री मुंबई विमानतळावर जस्टीनचे त्याच्या खासगी प्रायवेट जेटमधून आगमन झाले. त्यावेळी जस्टीनला पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. 
 
काल रात्री नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या कन्सर्टला जवळपास 50 हजार प्रेक्षक उपस्थित होते. बॉलिवूडच्या तारे-तारकांपासून राजकीय नेतेमंडळीनी जस्टीनमय होण्याचा आनंद घेतला. जस्टीनने प्रेक्षकांची संवाद साधताना या शो ला नेहमीच माझ्या ह्दयात स्थान राहिले. ही एक उत्तम कॉन्सर्ट होती असे सांगितले. मुंबईकरांनीही बेबी गाण्याच्या ट्रॅकवर जस्टीनला साथ देऊन आपले प्रेम व्यक्त केले. 
 
गुरुवारी सकाळी जस्टीनने मुंबईतल्या झोपडपट्टीला भेट देऊन तिथल्या मुलांसोबत वेळ घालवला. जस्टीन बिबर सध्या वर्ल्डटूरवर असून त्याचा पुढचा शो दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे होणार आहे. 
 
मुंबई दौ-यामध्ये जस्टीनने अचंबित करणारी मागण्यांची यादी दिली होती. 
-जस्टीन बिबरच्या खोलीत पाण्याच्या २४ बाटल्या, एनर्जी ड्रिंकच्या ४, व्हिटॅमिन वॉटरच्या ६ बाटल्या, ६ क्र ीम सोडा आणि विविध फळांचा रस हेल्थ फूडच्या नावे नारळ पाणी, बदाम शेक, प्रोटीन पावडर, शुद्ध देशी मध, केळी आणि हर्बल टीसह ताजी  फळे
-जस्टीन बिबरच्या जवळपास कुठेही ‘लिली’ची फुले दिसू नयेत.
-सोबत असलेल्या ताफ्याला सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा पथक हवे.
-याशिवाय बिबरचे ८ सुरक्षा गार्डही त्यांच्या सुरक्षेसाठी सोबत असतील.
-जस्टीन बिबर ज्या वेळी प्रवास करेल, त्या वेळी १० कंटेनर साहित्य त्याच्यासोबत असेल. यामध्ये त्याचा सोफा सेट, प्ले-  स्टेशन, वॉशिंग मशिन, टेबल-टेनिसचे टेबल यासारख्या साहित्याचा समावेश आहे.

Web Title: If Justin Bieber was a Marathi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.