'...तर आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू', पंढरपूर कॉरिडॉरला विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 01:25 PM2022-11-25T13:25:05+5:302022-11-25T13:27:18+5:30

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबवण्यात येत असलेल्या कॉरिडॉरबाबत राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा निर्धार

If Maharashtra Govt does not take action on Pandharpur Corridor will invite Karnataka Chief Minister for Ashadhi Mahapuja | '...तर आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू', पंढरपूर कॉरिडॉरला विरोध!

'...तर आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू', पंढरपूर कॉरिडॉरला विरोध!

googlenewsNext

पंढरपूर :

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात राबवण्यात येत असलेल्या कॉरिडॉरबाबत राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा निर्धार केला असल्याची माहिती श्री पंढरपूर संत भूमी बचाव समितीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपुरकर यांनी सांगितले. 

पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी मंदिर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.यावेळी अनेक राजकीय मंडळी व विविध समित्यांचे  अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी फत्तेपुरकर हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, नगरसेवक विक्रम शिरसट, माजी नगरसेवक ऋषीकेष उत्पात, रा. पा. कटेकर, श्रीकांत हरिदास, वैभव येवनकर, राजेंद्र वटटमवार, श्रीरिष परसवार उपस्थित होते. या प्रसंगी कॉरिडॉर रद्द करा अशी मागणी करण्यात आली.

भाजपचे पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामा
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कॉरिडॉर भाजप सरकारकडून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी कॉरिडॉर राबविण्यात येत आहे. हा कॉरिडॉर राबविण्याताना मंदिर परिसरातील नागरिकांची दुकाने व घरे पाडली जाणार आहेत. त्यास विरोध म्हणून उपोषण सुरू केले आहे. कॉरिडॉर रद्द न झाल्यास पंढरपुरातील सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष व नगरसेवक विक्रम शिरसट यांनी सांगितले.

Web Title: If Maharashtra Govt does not take action on Pandharpur Corridor will invite Karnataka Chief Minister for Ashadhi Mahapuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.