गरज भासल्यास धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेणार
By admin | Published: October 13, 2014 01:28 PM2014-10-13T13:28:12+5:302014-10-13T13:30:28+5:30
राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण असून निकालानंतर गरज भासल्यास धर्मनिरक्षपेक्ष पक्षांना सोबत घेण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा ट्रेंड विधानसभा निवडणुकीत नाही. आता निश्चित वेगळी परिस्थिती असून राष्ट्रवादीसोबत असणारी आघाडी फुटल्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. राज्यात काँग्रेसला चांगले वातावरण असून निकालानंतर गरज भासल्यास धर्मनिरक्षपेक्ष पक्षांना सोबत घेण्यात येईल, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नगर येथे पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. अल्पसंख्याक, मागसवर्गीय, दलित आणि शेतकरी हे पक्षाचे पाठबळ असल्याने काँग्रेसला अडचण नाही. काँग्रेसच्या उमेदवारांच्या लढती या मतदारसंघनिहाय परिस्थितीनुसार लढविल्या जात आहेत. आघाडी असताना ज्यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. सभागृहाचे काम बंद पाडले. त्यांना आज पक्षात घेवून त्यांनी उमेदवार्या दिल्या असल्याची टीका त्यांनी भाजपाचे नाव न घेता केली.
जिल्ह्यात स्टार प्रचारकांची उणीव भासली या प्रश्नांवर बोलतांना थोरात यांनी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना गल्लीत येण्यास र्मयादा पडतात. तशी अपेक्षाही चुकीची आहे. पूर्वी आचारसंहितेचा कालावधी दीड महिन्यांपेक्षा अधिक असायचा, आता ३६ दिवसांत पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे वेळेची र्मयादा पडते.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडे तीन जागा असून त्या जागा या निवडणुकीत कायम राहणार असून त्यात वाढ होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झालेले नसल्याने त्यावर भाष्य करणे चुकीचे ठरेल, असे ते म्हणाले.