विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 11:43 PM2018-09-01T23:43:36+5:302018-09-01T23:43:56+5:30

देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

if the opponents do anything, the next government is BJP - Ramdas Athawale | विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच- रामदास आठवले

विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच- रामदास आठवले

Next

वाशिम : देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मुद्रा, उज्ज्वला, पीकविमा, ग्रामसडक यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबवून तळागाळातील लोकांचे हित जोपासले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बालून दाखविला.
विद्यमान भाजपा सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठविल्या जात आहेत; परंतु संविधान बदलण्याच्या नव्हे; तर ते अधिक मजबूत करण्याचा विचार सरकारचा असल्याचे सांगून आठवले म्हणाले, भाजपा सरकारने आपल्या कारकिर्दीत ‘अ‍ॅॅट्रॉसिटी अ‍ॅॅक्ट’ला कुठलाही धक्का बसू दिला नाही. याशिवाय जातीनिहाय आरक्षणाचा विषयदेखील सरकार अभ्यासपूर्ण हाताळत आहे. सरकारच्या याच सर्वसामान्यांच्या हितकारी ध्येयधोरणांमुळे ‘आरपीआय’ यापुढेही भाजपासोबतच राहणार आहे.
कोरेगाव भीमा येथील दंगल, संभाजी भिडे यांची भूमिका, आदींबाबत छेडले असता, कोरेगाव भीमा येथील दंगल सवर्णांनी घडवून आणल्याचे सांगून त्याच्याशी एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नसल्याचे ते म्हणाले. संविधानाला विरोध करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी भूमिका संभाजी भिडे यांनी बाळगली आहे. पोलीस प्रशासनाने यादृष्टीने तपास करावा, असेही आठवले म्हणाले.

Web Title: if the opponents do anything, the next government is BJP - Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.