"विधान परिषदेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर...", भास्कर जाधव यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 05:11 PM2024-07-12T17:11:13+5:302024-07-12T17:12:40+5:30

Bhaskar Jadhav : राज्यात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या परिसरात भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

"If Pankaja Munde is defeated in the Legislative Council...", Bhaskar Jadhav's big statement | "विधान परिषदेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर...", भास्कर जाधव यांचं मोठं विधान

"विधान परिषदेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर...", भास्कर जाधव यांचं मोठं विधान

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर त्या राजकीय नेत्याची कारकीर्दच बरबाद होईल. त्यामुळे ते नेते पंकजा मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी नाही तर आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना निवडून आणतील, असे ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी म्हटले. दरम्यान, भास्कर जाधव यांच्या विधानाचा रोख हा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या परिसरात भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मागील दोन निवडणुका पंकजा मुंडे यांचा गेम हा भाजपच्याच नेत्यांनी केला. मात्र, या निवडणुकीत त्या निवडून येतील. कारण आतापर्यंत ज्या नेत्याने पंकजा मुंडे यांचा गेम केला. त्याच्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर त्या राजकीय नेत्याची कारकीर्दच बरबाद होईल. त्यामुळे ते नेते पंकजा मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी नाही तर आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना निवडून आणतील, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान झाले आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी २७४ आमदारांनी मतदान केले असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी मिळाल्याने त्यांचा राजकीय वनवास आता संपणार, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: "If Pankaja Munde is defeated in the Legislative Council...", Bhaskar Jadhav's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.