तर जनताच सरसकट धक्का देईल - पवार
By admin | Published: July 8, 2017 03:48 AM2017-07-08T03:48:50+5:302017-07-08T03:48:50+5:30
राज्य सरकार कर्जमाफीबाबत गोंधळलेले दिसते. सर्वप्रकारच्या शेतीसंबंधित कर्जाला माफी दिली नाही तर जनताच सरसकट
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण (जि.सातारा) : राज्य सरकार कर्जमाफीबाबत गोंधळलेले दिसते. सर्वप्रकारच्या शेतीसंबंधित कर्जाला माफी दिली नाही तर जनताच सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी दिला.
श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ शरद पवार यांना शुक्रवारी सायंकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, शेतीतील ज्यांना कळते त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत असतात; मात्र सत्तेवर असलेले भाजप सरकार सरकसट कर्जमाफीवरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांची कर्जे विविध प्रकारची असतात. काही तर बँकाबरोबरच पतसंस्थांकडूनही कर्ज घेतात. मात्र पतसंस्थांना कर्जमाफी दिलेली नाही.