"पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार, तर त्यांनी ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवं...!" नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:58 IST2025-04-09T12:58:20+5:302025-04-09T12:58:55+5:30
"नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे," असे राऊत यांनी म्हटले आहे.

"पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार, तर त्यांनी ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवं...!" नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी बेटकर यांच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना श्रीकृष्ण, असे संबोधले होते. यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता, संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या टीलेला प्रत्त्युत्तर दिले. ""नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे," असे राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते.
बावनकुळे आणि उदय सामनंत यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले, "मला पोटशूळ उठत नाही. मी अजिबात तुलना केलेली नाही. त्यांनी पहाव, ते मुर्ख लोक आहेत. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का? नरेंद्र मोदी विष्णूचे 13 वे 14 वे अवतार, नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल, आकाशातून देवानेच पाठवले आहे. त्यांची छत्रपतींशीच तुलना होते. हे या बावनकुळेंना आणि उदय सामंतांना चालू शकते का? कुणीही कुणाची तुलना केलेली नाही. आम्ही माणसं आहोत. देव नाही. म्हणून आम्ही संघर्ष करत आहोत. आम्ही माणसं आहोत, म्हणून आमच्या पाटीत खंजीर खुपसले गेले. उद्धव ठाकरे यांचे 'उद्धव' हे नाव, भगवान श्रीकृष्णांची अनेक नाव होती, त्यात उद्धव एक नाव होते, असे मी सांगितले.
राऊत पुढे म्हणाले, "सहदेव हे महाभारतातील एक पात्र होते. जे पांडव होते, त्यात एक सहदेव होते आणि संजय आहेच कायम महाभारतात. यांच्या कानाचे ऑपरेशन करायला हवे किंवा यांच्या मेंदूत जो कचरा साचला आहे, तो साफ करायला हवा. आम्ही कधी बाळासाहेबांचीही देवाशी तुलना केली नाही. कारण, बाळासाहेबांना ते आवडत नव्हतं. यांना हिंदू हृदयसम्राट समजले नाही, यांना वीर सावरकर समजजले नाहीत, यांना उद्धव ठाकरे समजले नाही, मग यांना काय समजते? यांना केवळ चमचेगिरी आणि बूट चाटे गिरी कळते."
"नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात उठले आहे आणि केवळ एकच देश भारत देश तोंडात गोळ्या घालून बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत ना, मग या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे. काही बोलतात हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे आणि रत्नागिरीचे उदय सामंत. सत्तेवर बसले आहेत. भोंगे सुटले आहेत," असेही राऊत म्हणाले.