राणे केंद्रात मंत्री झाले, तर शिवसेना अस्वस्थ होणार? संजय राऊत म्हणाले, फेरबदलानंतर बोलेन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 11:41 AM2021-07-07T11:41:02+5:302021-07-07T11:42:27+5:30
नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील मोठे राजकीय नेते. ते शिवसेना पक्ष प्रमुख व महाविकास आघाडीच्या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात.
व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश झाला तर त्यामुळे शिवसेना खूप अस्वस्थ होईल आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात एकमेकांपासून दुरावलेल्या भाजप व शिवसेनेला पुन्हा एकत्र आणण्याच्या नव्या प्रयत्नांत अडथळा होऊ शकताे.
राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल या चर्चेला शिवसेना फार महत्त्व देत नाही. प्रसारमाध्यमांत राणेंबाबतच्या आलेल्या चर्चांकडे लक्ष वेधले असता शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत म्हणाले, “आधी मंत्रिमंडळाची पुनर्रचना तर होऊ द्या, मग मी त्यावर बोलेन.”
नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील मोठे राजकीय नेते. ते शिवसेना पक्ष प्रमुख व महाविकास आघाडीच्या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राणे यांना सक्रिय करण्याचा कोणताही प्रयत्न हा कोकणात शिवसेनेला दुबळे करण्याचा भाग आहे, असे सूत्रांचे म्हणणे. विशेषत: सध्या भाजप आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे टाळत असताना काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची राजधानी दिल्लीत भेट झाली. ती अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चालली.
इतिहास काय?
- महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना हा क्रमांक एकचा भागीदार असायचा.
- परंतु, २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत तो त्या स्थानावरून दूर गेला. शिवसेना भाजपसोबत केंद्रात सत्तेतही होती.