रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्षपदावर राहिल्यास विरोधकांचाच फायदा- शरद पवार
By Admin | Published: May 11, 2017 09:02 PM2017-05-11T21:02:18+5:302017-05-11T21:02:18+5:30
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे. रावसाहेब दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदावर असणे हे विरोधकांच्या फायद्याचे असल्याचं म्हणत पवारांनी दानवेंना टोला हाणला आहे. विरोधकांनी दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करू नये. दानवेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा विरोधी पक्षांनाच जास्त फायदा होईल, असे पवार म्हणाले आहेत. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही कानउघाडणी केली आहे.
शिवसेना राज्यभरात दौरा करत असतानाच भाजपाही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आपण मात्र निवांत आहोत. गेली 15 वर्षं आपण सत्ता उपभोगली. सरकार जाऊन अडीच वर्षं झाली तरी सत्ताधा-यांसारखी मानसिकता अजून आपली गेली नाही. त्यामुळे सर्वात आधी मानसिकता बदला आणि कामाला लागा. सद्यस्थितीत रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. लोकांना विरोधकांकडून अपेक्षा आहेत. विरोधकांनी लोकांच्या अपेक्षांची पूर्ती केल्यास भविष्यात नक्कीच वेगळं चित्र दिसेल, असे पवार म्हणाले.

तत्पूर्वी तूर खरेदीवरून शेतक-यांना साले म्हणून त्यांचा अपमान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही, मन दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.