आरक्षणाचा निवडणुकीत फायदा झाला तर नवल नाही - शरद पवार
By admin | Published: June 26, 2014 02:16 PM2014-06-26T14:16:19+5:302014-06-26T15:28:13+5:30
मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा आघाडी सरकारला निवडणुकीत फायदा झाला तर नवल नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
Next
>ऑनलाइन टीम
कराड, दि. २६ - मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा आघाडी सरकारला निवडणुकीत फायदा झाला तर नवल नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. कराडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने बुधवारी शिक्षण व नोक-यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, ताकाला जाऊन भांड लपवण्यात काय अर्थ आहे? आता निवडणुकीला फायदा होत असेल तर आम्ही काही साधू-संतांची टोळी नाही, आरक्षणाच्या निर्णयाचा निवडणुकीला फायदा होत असेल तर काही नवल नाही.
यावेली त्यांनी नोदी सरकारच्या कारभारावरही टीका केली. मोदी सरकारची वृत्ती ही धरसोडीची असल्याचे एका महिन्याच्या कालावधीत लक्षात आले, असे ते म्हणाले.