सलमानच्या सिनेमानं 300 कोटी कमावले तर त्याची किंमत वाढणारच ना? - राज ठाकरे

By admin | Published: May 5, 2016 01:19 PM2016-05-05T13:19:19+5:302016-05-05T13:31:37+5:30

व्यंगचित्रकारांना आणि व्यंगचित्रकलेला सुगीचे दिवस यावे असं वाटत असेल तर व्यंगचित्रांचा दर्जा प्रचंड सुधारायला हवा असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं

If Salman's cinemax earns Rs 300 crores then will it not be worth the price? - Raj Thackeray | सलमानच्या सिनेमानं 300 कोटी कमावले तर त्याची किंमत वाढणारच ना? - राज ठाकरे

सलमानच्या सिनेमानं 300 कोटी कमावले तर त्याची किंमत वाढणारच ना? - राज ठाकरे

Next
>व्यंगचित्रकारांना आणि व्यंगचित्रकलेला सुगीचे दिवस यावे असं वाटत असेल तर व्यंगचित्रांचा दर्जा प्रचंड सुधारायला हवा असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. 5 मे 2016 या वर्ल्ड कार्टुनिस्ट डे निमित्त लोकमतचे गेस्ट एडिटर झालेल्या राजनी व्यंगचित्रकारांनी आपलं कॅलिबर वाढवायला हवं असं ते म्हणाले. व्यंगचित्रकारांना चांगले पैसे मिळत नाहीत, हे मत खोडून काढताना त्यांनी आर के लक्ष्मण यांचा दाखला दिला.
टाइम्समध्ये बाकिचे सगळे एकिकडे आणि लक्ष्मण एकीकडे असं चित्र होतंच ना? असं विचारत राजनी उत्कृष्ट काम असेल तर उत्पन्नाला मर्यादा नसतात असे सूचित केले. सलमान खानच्या चित्रपटानं 300 कोटींचा व्यवसाय केला तर त्याची किंमत वाढणारच, पण एखाद्याचा सिनेमा दुसऱ्या दिवशी आपटला आणि तो सलमानएवढे पैसे मागायला लागला तर चालेल का? असा प्रश्न विचारत राजनी, दर्जेदार कामाचं महत्त्व अधोरेखीत केलं.
 
तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून करीअर करायचंय, मग हे वाचाच...
 
तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी भुतकाळात जमा होत असल्याने व्यंगचित्र आणि पर्यायाने व्यंगचित्रकारांचं भविष्य नेमकं काय आहे ? हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी व्यंगचित्रकारांसाठी पर्याय उपलब्ध झालेला दिसत नाही. कार्टूनला एका वेगळ्या स्तरावर नेण्यात आलं आहे. अ‍ॅनिमेशनच्या सहाय्याने कागदावरचं हे निर्जीव जग जिवंत करण्यात आलं आहे. मात्र तरीही हे जग बनवण्यासाठी पहिली गरज असते ती व्यंगचित्रकाराची. 
सध्या टीव्ही चॅनेल्स ज्यामध्ये खासकरुन प्रसारमाध्यमं आणि वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्रकारांसाठी खुप मागणी आहे. रोज घडणा-या घटनांवर भाष्य करण्यासाठी त्यांची गरज भासते. अनेकदा जी छाप शब्दांमधून पाडता येत नाही ते काम व्यंगचित्राद्वारे करता येतं. याची अनेक उदाहरणंदेखील आपल्याकडे आहेत. व्यंगचित्रांद्वारे सरकार, समाजातीन चुकीच्या गोष्टींवर सर्रोस फटकेबाजी करता येते. 
इलेक्ट्रॉनिक मिडियामध्येदेखील व्यंगचित्रांवर आधारित कार्यक्रम केले जातात. तसंच उपहासात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी व्यंगचित्रांचा वापर करत अ‍ॅनिमेशन तयार केले जातात. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार कोणी करत असेल तर संधी नक्कीच उपलब्ध आहे.
 
 
व्यंगचित्रकार म्हणून करिअर करायचे असल्यास लागणारी पात्रता -
 
- व्यंगचित्रकार म्हणून करिअर करायचे असल्यास बारावी पास होणं गरजेचं 
- व्यंगचित्रकाराला सर्जनशीलतेसोबत तांत्रिक गोष्टींची माहिती असणेदेखील गरजेचं आहे
- एक चांगला चित्रकार असण्यासोबत व्यंगचित्रकाराला व्यंगचित्रकाराच्या सर्व पैलूंची माहितीदेखील असायला हवी
 
प्रमुख संस्था -
दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट्स, नवी दिल्ली
जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद

Web Title: If Salman's cinemax earns Rs 300 crores then will it not be worth the price? - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.