शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला, तर सर्वस्वी कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 04:54 PM2021-12-18T16:54:51+5:302021-12-18T16:55:13+5:30

शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून संपूर्ण हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

If the sentiments of chhatrapati Shivaji maharaj lovers erupt, then the Karnataka government will responsible says Eknath Shinde | शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला, तर सर्वस्वी कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा

शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला, तर सर्वस्वी कर्नाटक सरकारच जबाबदार; एकनाथ शिंदेंचा इशारा

Next

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्यांची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटकमधील (Karnataka) बंगळुरू शहरात घडला. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे. या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल आणि तसे झाल्यास त्यास कर्नाटक सरकारच पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशाराही राज्याचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून संपूर्ण हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. 

यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांची विटंबना करण्याचे प्रकार सीमावर्ती भागात घडले आहेत. मात्र आमच्या सहनशीलतेला देखील मर्यादा आहेत. बंगळुरू येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल. तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील, असेही शिंदे म्हणाले.
 

Web Title: If the sentiments of chhatrapati Shivaji maharaj lovers erupt, then the Karnataka government will responsible says Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.