लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी! शिंदे-पटोले संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 06:46 AM2024-02-27T06:46:38+5:302024-02-27T06:47:13+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवन परिसरात भेट झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : 'सामाजिक कार्यकर्ता होता, तोपर्यंत सर्व ठीक होते. लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतो मी,' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान सध्या चर्चेत आले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवन परिसरात भेट झाली. दोघेही एकमेकांसमोर आल्यावर त्यांच्यात खेळीमेळीत संभाषण झाले. यातील एका संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोख जरांगे-पाटलांच्या दिशेने का?
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारमधील मंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण सध्या तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे-पाटील यांच्या दिशेने का? अशी चर्चाही रंगत आहे.