राजकीय होर्डिंग लावल्यास फौजदारी
By admin | Published: October 20, 2016 01:10 AM2016-10-20T01:10:19+5:302016-10-20T01:10:19+5:30
विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय स्वरूपाचे कोणतेही अधिकृत, बेकायदेशीर फ्लेक्स, पोस्टर व होर्डिंग लावण्यास मनाई आहे.
पुणे : जिल्ह्यामध्ये नगर परिषदांसह विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय स्वरूपाचे कोणतेही अधिकृत, बेकायदेशीर फ्लेक्स, पोस्टर व होर्डिंग लावण्यास मनाई आहे. त्यामुळे कुठेही राजकीय फ्लेक्स, होर्डिंग दिसून आल्यास त्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिले आहे.
महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे श्रेय घेणारे तसेच वाढदिवस, शुभेच्छा यांचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. आचारसंहिता सुरू असताना अशी फ्लेक्सबाजी करून जाहिरातबाजी करण्यास सक्त
मनाई असते. त्यावर लगेच फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. बुधवारी झालेल्या मुख्य सभेत अनेक नगरसेवकांनी या फ्लेक्सबाजीचा मुद्दा उपस्थित केला. विशेष मेट्रो आम्हीच आणली, असे श्रेय घेणारे अनेक फ्लेक्स शहरात लागले असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आणून देण्यात आले.(प्रतिनिधी)