"मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज", सत्तारांच्या विधानानं चर्चेला उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 09:18 PM2022-05-30T21:18:56+5:302022-05-30T21:19:34+5:30

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

if supriya sules name is being discussed for cm post rashmi thackeray is also ready says abdul sattar | "मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज", सत्तारांच्या विधानानं चर्चेला उधाण!

"मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज", सत्तारांच्या विधानानं चर्चेला उधाण!

googlenewsNext

औरंगाबाद-

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सत्तारांनी रश्मी ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेण्याची ही पहिली वेळ नाही. हिवाळी अधिवेशावेळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिच्या दुखण्याच्या त्रासामुळे ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नसतानाही सत्तार यांनी यासंदर्भातील विधान केलं होतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. 

"शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्यासाठी २५ वर्षांपासून राज्यात पूजा झाली आहे. २५ वर्ष मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहावेत अशी विनंतीही सर्वांनी केली आहे. सुप्रियाताई मुख्यमंत्री झाल्यास कधी होतील, कोणत्या परिस्थितीत होतील हे आज मी काही बोलणार नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे. सुप्रियाताईंचा मुख्यमंत्रीपदासाठीचा नंबर २५ वर्षांनंतर लागावा ही ईश्वर, अल्लाहकडे प्रार्थना", असं अब्दुल सत्तार म्हणाले. 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का असे विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी "हे महाराष्ट्राची जनता ठरवेल; मी कसं ठरवणार?", अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील जनतेसोबत चर्चा केली. त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचं वक्तव्य केलं. 

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं तुळजाभवानीकडे घातल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Web Title: if supriya sules name is being discussed for cm post rashmi thackeray is also ready says abdul sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.