"10 सभा घ्या नाही तर 50 सभा घ्या, पण..."; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:33 AM2024-04-01T11:33:46+5:302024-04-01T11:34:24+5:30

"आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. कारण..."

If take 10 meetings or 50 meetings Sanjay Raut's serious allegations against Narendra Modi over Mumbai Dharavi | "10 सभा घ्या नाही तर 50 सभा घ्या, पण..."; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

"10 सभा घ्या नाही तर 50 सभा घ्या, पण..."; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

देशात लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षणे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नव-नवे मुद्दे उपस्थित करून आपापल्या विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवत गंभीर आरोप केले आहेत. एवढेच नाही, तर मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

...नरेंद्र मोदी येथे येऊन काय बोलणार? -
संजय म्हणाले, "आपण मुंबईत 10 सभा घ्या नाहीतर 50 सभा घ्या. पण मुंबईच्या जनतेने निश्चित केले आहे. यावेळी भाजप सर्वात आधी मुंबईतून तडीपार. देशात तर होणारच. मात्र आपण मुंबईवर ज्या पद्धतीने अन्याय केला आहे, मुंबई लुटण्याचा प्रयत्न केला आहे, मुंबई लुटून गुजरातला घेऊन जाण्याची, मुंबईतील मध्यमवर्गियांसोत जो छळ कपट केला आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी येथे येऊन काय बोलणार?"

मुंबई करांनी आपल्याला मते का द्यावीत? 
ज्या पद्धतीने आपण धारावी अदानींना विकली, ज्या पद्धतीने आपला धारावीसह मुंबईही अदानींना विकण्याचा कट आहे, असे आरोप करत, मुंबई करांनी आपल्या मते का द्यावीत? असा सवालही राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना केला. "आपण या आपण पंतप्रधान आहात. अजूनही आपल्याला वाटते आपण पंतप्रधान आहात, पण आपण आता पंतप्रधान नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होते, तेव्हा आपण जास्तीत जास्त कार्यवाहक पंतप्रधान असतात. पण आपण त्याच पद्धतीने फिरत असाल आणि घोषणा करत असाल, लोकांना धमक्या देत असाल, तर हे चालणार नाही," असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
 

Web Title: If take 10 meetings or 50 meetings Sanjay Raut's serious allegations against Narendra Modi over Mumbai Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.