दावाेस दाैरा यशस्वी, दाेन लाख रोजगारनिर्मिती हाेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:46 AM2024-01-19T05:46:03+5:302024-01-19T05:46:20+5:30
दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर रात्री आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. गुंतवणुकीचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असे ते म्हणाले.mu
मुंबई : दावोस दौरा गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरला असून दोन दिवसांत ३.५३ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून सुमारे २ लाख रोजगारनिर्मिती होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर रात्री आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. गुंतवणुकीचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असे ते म्हणाले.
जेम्स ज्वेलरी, पेपरपल्प, ग्रीन एनर्जी, हायड्रोजन एनर्जी आदी क्षेत्रात मोठी गुंतवणूक होईल. आरसीएल, निपॉन, जिंदाल, गोदरेज, अदानी यासारख्या कंपन्यानी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकिची तयारी दर्शवली. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असल्याने हे शक्य झाले.
पंतप्रधान माेदींचा जगभर प्रभाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव जगभर असल्याचे दिसून आले. अनेक उद्योजकांनी करार करताना मोदी यांच्या नेतृत्त्वाचा उल्लेख केला. तसेच मोदींच्या नावाचा महाराष्ट्राला फायदा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.