सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? रोहित पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 05:08 PM2023-12-13T17:08:37+5:302023-12-13T17:10:02+5:30
म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन दोन्ही युवक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरी गेल्याचे वृत्त आहे.
मुंबई : दिल्लीत लोकसभेचे कामकाज सुरू असताना तेथील सुरक्षा भेदून दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीमधून थेट सभागृहात उडी मारली आणि स्मोक कँडल फोडले. यामुळे लोकसभेत धूर झाला आणि गोंधळ उडाला. यादरम्यान या दोघांनाही खासदारांनी पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले. कामकाजादरम्यान घुसलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असे आहे. त्याच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. म्हणजेच एकूण चार जण होते. या चौघांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या सतर्कतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संसदेवरील हल्ल्याला आजच २२ वर्षे पूर्ण होत असताना तीन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत केलेला गोंधळ ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि सुरक्षेततेतील अक्षम्य त्रुटी आहे. सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? असा प्रश्न माझ्यासारख्याला यानिमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही, असे ट्विटद्वारे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
संसदेवरील हल्ल्याला आजच २२ वर्षे पूर्ण होत असताना तीन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन लोकसभेत केलेला गोंधळ ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि सुरक्षेततेतील अक्षम्य त्रुटी आहे. सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? असा प्रश्न माझ्यासारख्याला यानिमित्ताने… pic.twitter.com/tikdksXSeG
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 13, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन दोन्ही युवक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरी गेल्याचे वृत्त आहे. संसदेच्या कामकाजादरम्यान घुसलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असे आहे. या दोघांनी गॅलरीमधून थेट सभागृहात उडी मारली आणि स्मोक कँडल फोडले. यामुळे लोकसभेत धूर झाला आणि गोंधळ उडाला. यातील एक तरुण मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. त्याचे नाव अमोल शिंदे असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, त्यांच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. या चौघांची चौकशी सुरू आहे.