आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाला लागणार धक्का, केवळ १८ जागांचा सर्वेक्षणातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:00 AM2022-08-12T10:00:53+5:302022-08-12T10:01:47+5:30

इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

If the Lok Sabha elections are held today the BJP Shinde group will face a blow in Maharashtra claiming only 18 seats from the survey upa willl get mejority | आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाला लागणार धक्का, केवळ १८ जागांचा सर्वेक्षणातून दावा

आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाला लागणार धक्का, केवळ १८ जागांचा सर्वेक्षणातून दावा

googlenewsNext

राज्यातील सत्तानाट्यानंतर महिन्याभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी भाजसोबत राज्यात सरकार स्थापन केलं. दरम्यान, काही नुकतान राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला.

सध्या आगामी लोकसभा निवडमुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता कोणच्या बाजूनं कौल देणार याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवण्याचा दावा भाजपनं यापूर्वीही केला होता. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकहाती जिंकण्याचाही त्यांचा मानस आहे. परंतु नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून राज्यात भाजप आणि शिंदे गटासाठी पुढील वाटचाल कठीण असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना त्याचा फायदा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आलीये. तर दुसरीकडे याचा फटका मात्र भाजप शिंदे गटाला बसू शकतो.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सनं केलेल्या सर्वेक्षणानुसार आज जर लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, तर महाराष्ट्रात युपीएला ४८ पैकी ३० जागा मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर भाजपप्रणित एनडीला १८ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं झाल्यास ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेनं लोकसभेत एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल ४२ जागांवर विजय मिळाला होता. दरम्यान, शिवसेनेच्या अनेक खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा खासदार आहेत. दरम्यान, सध्या आमदारांच्या अपात्रतेवरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Web Title: If the Lok Sabha elections are held today the BJP Shinde group will face a blow in Maharashtra claiming only 18 seats from the survey upa willl get mejority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.