सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल तर...; उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:20 PM2023-01-23T14:20:21+5:302023-01-23T14:20:41+5:30

हिंमत असेल तर निवडणुका घ्या, मागेही बोललो होतो आजही तेच आव्हान कायम आहे. निवडणुका लवकर घ्याव्यात असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

If the politics of reconciliation is not to be done anymore, then no one should pretend to come together - Uddhav Thackeray Warns Congress-NCP | सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल तर...; उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल तर...; उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

Next

मुंबई - महाविकास आघाडीत कुणी कुठल्या जागा लढवायच्या हे ठरवण्याची गरज आहे. तशी वेळ आली आहे. ते ठरवल्यानंतर मित्रपक्षांना जागा देण्याचं ठरेल. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली. नागपूरमध्ये आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराला सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला. अमरावती काँग्रेसनं आमचा माणूस उमेदवार म्हणून उभा केला. त्यामुळे सामंजस्याचं राजकारण यापुढे करायचं नसेल तर कुणी एकत्र येण्याचं नाटक करू नये असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला आहे. 

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युती आज घोषणा करण्यात आली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे ३ वर्षापूर्वी शरद पवारांसोबत कसे संबंध होते हे जगजाहीर आहे. जेव्हा फसवणुकीचं राजकारण होतंय हे लक्षात आले तेव्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो. जवळपास अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार यशस्वी चालवलं. हेतू चांगला असेल तर पुढील गोष्टी व्यवस्थित होतात. प्रकाश आंबेडकरांसोबत आमच्या बैठका झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा झालीय. महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर येण्यास कुणाची हरकत नाही. मविआत प्रत्येकाने आपापल्या मित्रपक्षाचं हित सांभाळायचं हे ठरले आहे. देश प्रथम हा सामायिक हेतू आहे. त्या हेतूला तडा जाणार नाही. मविआचे घटक पक्ष म्हणून वंचितने वाटचाल करण्यास काही हरकत नाही असं त्यांनी सांगितले. 

हिंमत असेल तर निवडणूक घ्या 
हिंमत असेल तर निवडणुका घ्या, आजही तेच आव्हान कायम आहे. निवडणुका लवकर घ्याव्यात. जागावाटपाचा विचार केल्याशिवाय आम्ही एकत्रित आलो नाही. गद्दार आणि त्यांच्या राजकीय बापजाद्यांना आव्हान आहे लवकरात लवकर निवडणुका घ्या असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपा-शिंदे गटाला दिले आहे. तर आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे माझ्या वडिलांनी सांगितले. त्याच मार्गावर आम्ही पुढे वाटचाल करतोय. आमच्या आजोबांनी चुकीच्या प्रथांना विरोध केला. हिंदुत्व हा आमचा श्वास, राष्ट्रीयत्व आहे हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे त्यामुळे आमची युती योग्य दिशेने वाटचाल करेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 
 

Web Title: If the politics of reconciliation is not to be done anymore, then no one should pretend to come together - Uddhav Thackeray Warns Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.