शिंदे-फडणवीस सरकारला थोडा वेळ दिला तर, राज्याची परिस्थिती बदलेल - चित्रा वाघ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:10 PM2022-12-05T20:10:22+5:302022-12-05T20:10:40+5:30

Chitra Wagh : संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकता, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. टाचणीभर जागाही कोणा इतर राज्याला देणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना चिंता करायची गरज नाही, असा टोला भाजपाच्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

If the Shinde-Fadnavis government is given some time, the situation in the state will change - Chitra Wagh | शिंदे-फडणवीस सरकारला थोडा वेळ दिला तर, राज्याची परिस्थिती बदलेल - चित्रा वाघ 

शिंदे-फडणवीस सरकारला थोडा वेळ दिला तर, राज्याची परिस्थिती बदलेल - चित्रा वाघ 

Next

नंदुरबार :  सीमावर्ती भागातील जे बांधव गुजरात आणि कर्नाटकमध्ये जाण्याच्या प्रकरणात सरकारवर आरोप करण्यापेक्षा सरकारला थोडा वेळ द्या, सरकारला फक्त 125 दिवस झाले आहे. शिंदे-फडवणीस सरकार सक्षम आहे. या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ दिला तर जे बांधव इतर राज्यात जायचे म्हणत आहे. त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल, असा विश्वास भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. 

संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकता, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. टाचणीभर जागाही कोणा इतर राज्याला देणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना चिंता करायची गरज नाही, असा टोला भाजपाच्याचित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आमचे नाव घेऊन आमच्या नक्कल करुन त्यांची दुकान चालत असतील तर आमच्या शुभेच्छा. पण, आपल्या सरकारने मागील अडीच वर्षात काय दिवे लावले, यावर बोलले तर बरं होईल असा टोला चित्रा वाघ यांनी  सुषमा अंधारेना टोला लगावला आहे. 

याचबरोबर, औरंगाबाद मधल्या ओझर घटनेप्रकरणी मी स्वत पोलीस अधिक्षकांसोबत बोलले आहे, आमची महिला मोर्चाची टीम पिडीताची भेट घेणार आहे. तर सोलापुर दोन जुळ्या बहिणी एका सोबत विवाह प्रकरणी चुकीचे पायंडे पडतात की काय अशी भिती वाटत आहे. या प्रकरणी कायदेतज्ज्ञ यातील कायद्याच्या अनुशंगाने सर्व काही मांडतील. मात्र अशा घटना चुकीच्या असल्याचे मत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: If the Shinde-Fadnavis government is given some time, the situation in the state will change - Chitra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.