तक्रार आल्यास संपकरी डॉक्टरांवर कारवाई
By admin | Published: May 18, 2015 04:39 AM2015-05-18T04:39:51+5:302015-05-18T04:39:51+5:30
सर्वाेच्च न्यायालयाने संप करणाऱ्या डॉक्टरांवर घेतलेल्या कारवाईच्या निर्णयानंतर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) सर्व राज्य शाखांना
मुंबई: सर्वाेच्च न्यायालयाने संप करणाऱ्या डॉक्टरांवर घेतलेल्या कारवाईच्या निर्णयानंतर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) सर्व राज्य शाखांना एक परिपत्रक पाठवले आहे. या परिपत्रकात संप करणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई करा, असे सांगितले आहे. पण, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत परिषद कोणतीही कारवाई करणार नाही.
डॉक्टरांची सेवा ही जीवनावश्यक सेवा आहे. डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे रुग्णांवर परिणाम होतो, यामुळे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. एमसीआयने प्रत्येक राज्यातील परिषदेला याची अंमलबजावणी करावी, असे परिपत्रक पाठवले आहे. १६ मार्चला झालेल्या एका बैठकीत एमसीआयने हा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी असे सांगितले की, परिषदेकडे परिपत्रक पोहचले आहे. पण, संपकरी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे काम परिषदेचे नाही. राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा संपकरी डॉक्टरांवर कारवाई करू शकते.
(प्रतिनिधी)