आत्म्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास पैशांचा पाऊस पडण्याची बतावणी

By admin | Published: February 5, 2017 07:31 PM2017-02-05T19:31:48+5:302017-02-05T19:31:48+5:30

महाराजांसमोर नग्नावस्थेत बसल्यानंतर तेथे परीकथेमधील जीन (आत्मा) येतो, त्याच्यासोबत शरिरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर पैशांचा पाऊस पडत असल्याची बतावणी

If there is a correlation with the soul, then it will be rampant for rain | आत्म्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास पैशांचा पाऊस पडण्याची बतावणी

आत्म्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यास पैशांचा पाऊस पडण्याची बतावणी

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - लोणावळ्यातील महाराजांसमोर नग्नावस्थेत बसल्यानंतर तेथे परीकथेमधील जीन (आत्मा) येतो, त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर पैशांचा पाऊस पडत असल्याची बतावणी करीत एका महिलेला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार थेट पोलिसांपर्यंत पोचला असून सहकारनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. 
 
 रेमंड सॅम्युअल फ्रँकलिन (रा. नांदेड सिटी), शेख झहीर अब्बास (रा. चिंचवड), रेश्मा रामदास पाडळे (रा. चराडे वस्ती, वडगाव धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धनकवडीमध्ये राहणा-या एका महिलेने फिर्याद दिली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम ३(१), (२) व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम (१) (क) (ग) (घ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार बुधवार ते शुक्रवार दरम्यान सहकारनगर येथील गणपती मंदिर तसेच सारसबागेत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेच्या एका मैत्रीणीमार्फत रेश्माशी तिची ओळख झाली होती. रेश्मा हिच्यासोबत अधुनमधुन त्यांचे फोनवर बोलणे होत होते. १ फेब्रुवारी रोजी रेश्माने पिडीत महिलेला फोन करुन भेटायला बोलावले. त्यानुसार, ही महिला सहकारनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या गणपती मंदिराजवळ रेश्माला भेटली. रेश्माने रेमंड याच्याशी तिची ओळख करुन दिली.त्यावेळी रेमंड याने तिला  ‘माझ्या ओळखीचा एक महाराज आहे. तो पैशांचा पाऊस पाडतो, त्याला एक तरुण मुलगी जिच्या शरीरावर कोठेही गोंदण नाही, तिळ नाही, शस्त्रक्रिया न झालेली, सुंदर अशा मुली हव्या आहेत. अशा चार मुली बघून दे. त्याबदल्यात २० लाख रुपये देतो. महाराजांना मी एक मुलगी दिली तर मला दहा लाख रुपये मिळाले.’ अशी बतावणी केली. 
 
त्यानंतर मंदिरातच त्याने विविध पोझमध्ये पिडीत महिलेचे फोटो काढले. त्यानंतर रेमंडने शुक्रवारी पुन्हा फोन करुन सारसबागेत भेटायला बोलावले. सारसबागेमध्ये त्याने आरोपी शेख जहीर अब्बास याच्याशी तिची ओळख करुन दिली. त्यावेळी शेख याने  ‘लोणावळ्यातील महाराजांकडे मुली पाठवायच्या असून ते सर्व मुलींना एका खोलीमध्ये नग्नावस्थेत पाहतात. त्यांच्यासमोर बसवून होम करतात. त्यानंतर थोड्यावेळात एक जीन (आत्मा) तेथे येतो आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. त्या वेळात पैशांचा पाऊस पडत राहतो. तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकता. या प्रकाराला महिलेने होकार देऊन घर गाठले. 
 
याबाबत शनिवारी रात्री त्यांनी ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या नंदाताई ढावरे यांना सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी ढावरे यांनी अशा प्रकारे कधीही पैशांचा पाऊस पडत नसतो. अशा प्रकारे पैशांच्या आमिषाने महिला व मुलींची फसवणूक करुन बलात्कार केले जातात. तसेच ब्लॅकमेल केले जाते असे त्यांनी समजावून सांगितले. झालेला प्रकार लक्षात येताच ढावरे यांच्यासह संबंधित महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांनी सर्व हकीकत ऐकल्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला. पुढील तपास निरीक्षक (गुन्हे) आप्पासाहेब वाघमळे करीत आहेत.

Web Title: If there is a correlation with the soul, then it will be rampant for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.