शंभर बारामती झाल्यास देशाचा विकास निश्चित!

By admin | Published: October 18, 2015 03:17 AM2015-10-18T03:17:31+5:302015-10-18T03:17:31+5:30

बारामतीच्या विकासाने ग्रामीण भागात क्रांती झाली आहे. अशा १०० बारामती विकसित झाल्या, तर देशाचा विकास झपाट्याने होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी केले.

If there is hundred Baramma, the country's development is certain! | शंभर बारामती झाल्यास देशाचा विकास निश्चित!

शंभर बारामती झाल्यास देशाचा विकास निश्चित!

Next

बारामती : बारामतीच्या विकासाने ग्रामीण भागात क्रांती झाली आहे. अशा १०० बारामती विकसित झाल्या, तर देशाचा विकास झपाट्याने होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडील मुक्काम व दोन जाहीर कार्यक्रम यामध्ये राजकीय भाष्य करण्याचे त्यांनी खुबीने टाळले.
विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ असे नामकरण करण्यात आले, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेटली बोलत होते. या वेळी शरद पवार, खासदार राहुल बजाज, पालकमंत्री गिरीश बापट, उद्योजक बाबा कल्याणी, माजी मंत्री अजित पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार यांच्या निमंत्रणावरून दिलेल्या आजच्या भेटीनंतर ग्रामीण भागात क्रांती झाल्याचे दिसले, असे सांगून जेटली म्हणाले, सर्वच क्षेत्रांत स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे योग्यता, क्षमता महत्त्वपूर्ण आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या पाहिजेत.

महाराष्ट्राच्या उभारणीत किर्लाेस्कर, बजाज कुटुंबीयांचे योगदान आहे. महात्मा गांधींच्या विचाराने हा परिवार देशाच्या विकासासाठी कार्यरत आहे. येथील आभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर चांगला आदर्श असावा, या हेतूने आभियांत्रिकी महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

अप्रत्यक्ष करात कपात
कॉर्पोरेट कंपन्यांकडून सरकारला २२ ते ३४ टक्के कर मिळतो़ पुढील ४ वर्षांत हा कर २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे़ अप्रत्यक्ष करही कमी करण्यात येणार असल्याचे जेटली यांनी पुण्यात उद्योजकांच्या भेटीदरम्यान सांगितले.

‘पवार देशाला न लाभलेले पंतप्रधान’
शरद पवार म्हणजे देशाला न लाभलेले पंतप्रधान आहेत, अशा शब्दांत राहुल बजाज यांनी पवार यांचा गौरव केला. अरुण जेटली यांच्या उपस्थितीत त्यांनी ही जाहीर स्तुती केली. ते म्हणाले, सर्व क्षेत्रांत पारंगत असलेले असे हे व्यक्तिमत्त्व आहे. हे आपण राजकीय हेतूने बोलत नाही. मात्र, त्यांच्याबरोबर खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांचा अनुभव जवळून घेता आला आहे. त्यांनी शरद पवार आणि अरुण जेटली यांच्यासमवेतच्या जुन्या आठवणींंना उजाळा दिला.

उभय नेत्यांचे राजकीय मौन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामतीभेटीनंतर जेटली यांच्या बारामतीदौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. शरद पवार यांच्या माळेगाव येथील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी ते मुक्कामाला होते. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी राजकीय भाष्य टाळले. पवार यांनी शेतीविषयक केलेल्या धोरणात्मक मागण्यांवरदेखील अर्थमंत्री म्हणून जेटली यांनी भाष्य केले नाही.

Web Title: If there is hundred Baramma, the country's development is certain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.